पान:वनस्पतीविचार.djvu/227

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ वें]. बीज. २०१ -..... hindiwwwwwwwwwwwwwwwwwwwww कलमांस पावसाळा हवा असतो. विशेषेकरून जेव्हां झाडांतील रसाचें जोमाने अभिसरण होत असते, अशा वेळेस कलमें उत्तम साधतात, व हीच वेळ त्यांस योग्य असते. फाटे लावणे ( Cutting ), दाबाचे कलम करणे, अगर जडवे बांधणे ( Layering ), फांदीवर फांदी घेणे (Grafting), डोळे भरणे ( Budding ) वगैरे प्रकार कलमांचे आहेत. यात फांटे लागण्यास फांद्या चांगल्या जाड व टणक पसंत करून त्यांची रुंदी सुमारे एक बोटाइतकी ठेवावी. फांट्याची लांबी एक फुटापासून दीड फूट असावी. ज्या फांट्यांवर कळ्या असतील ते. फांटे पसंत करावेत. हे फांटे दीड इंच जमिनीत पुरून वरच्या टोकांस शेण लावून ठेवावें. रोज दोन वेळा पाणी देत जावें. त्या कळ्यांमधून नवीन पाने हळू हळू फुटतात, व जमिनीत मागंतुक मुळ्या ( Adventitious roots) निघतात. मुळ्या फुटल्या म्हणजे रोपा रुजला असे समजावें. अशा रीतीने गुलाब, जासवंदी, कण्हेर, पांढराचाफा, कोटन, वगैरेची कलमें करितात. - फांदी वांकवून, जमिनीत घुसवून त्यावर थोडी माती टाकून दाबून कलम करावें. अशा प्रकारच्या कलमास दाबाचे कलम ( Layering ) म्हणतात. जाई, जुई, लिंबू , क्रोटन वगैरेमध्ये अशी कलमें नेहमी करण्यांत येतात. मागें खोडाचे वर्णन करतांना नैसर्गिक दाबाचे कलम कसे होत असते, याविषयी सांगितलेच आहे. फांदीस योग्य परिस्थिति उत्पन्न करून आगंतुक मुळ्या (Adventitious roots) सोडावयास लावणे हे मुख्य तत्त्व अशा कलमांत असते. कित्येक वेळां शैवाळ, फांदीवर सांच्यापाशी बांधून, सांध्यावर आडवी खाप करितात. नेहमी दोन वेळां पाण्याची व्यवस्था राखण्यांत येते. आडव्या खातून वेगळ्या मुळ्या फुटून त्या शैवाळांत शिरतात. पुढे ती फांदी चाकूनें कापून दुसरे जागी लावण्यांत येते. त्या नवीन सुटलेल्या मुळ्या आयत्या जमिनीत शिरून अन्नग्रहण करू लागतात. अशा रीतीने साखरलिंबू, संत्रा, गुलाच, जांभूळ वगैरेमध्ये कलमें पुष्कळ वेळां करितात. फांदी वाकवून जमिनीत पुरणे किंवा फांदीवर कृत्रिम जमिनीसारखी व्यवस्था करणे, ह्या दोन्ही गोष्टी एकच असतात, आणखी एक प्रकारचे कलम आहे की, ज्यामध्ये एका झाडाची फांदी दुसऱ्या झाडावर बसवून त्याचा त्या फांदीशी एकजीव करितात. आंबा, लोकॅट,