पान:वनस्पतीविचार.djvu/228

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ वनस्पतिविचार, [प्रकरण maanwarmarware. फणस वगैरेमध्ये ही कलमें नेहमी करितात. प्रथम साधी बीजें जमिनीत पेरून त्यांपासून रोपे तयार करावे. रोपे सरासरी एक वर्षाचे झाल्यावर, पावसाळा सुरू झाला म्हणजे ज्या झाडांचे कलम घ्यावयाचे असेल, त्यांवर मुळ्या न दुखवितां, मातीसकट केळीच्या सोपटांत गुंडाळून ते टांगण्याची व्यवस्था करावी. रोपे जमिनीत असतांना तीन तीन महिन्यांत एका जागेपासून दुसरे जागी ते बदलण्याची व्यवस्था करावी. म्हणजे रोप्यांची मुळे जमिनीत फार खोलवर जाणार नाहीत. ज्या फांदीवर तो रोपा टांगला असेल, तिची व रोप्यांची रुंदी सारखी असावी. सकाळी अगर संध्याकाळी दोन्हींच्या फांया चाकूने उभ्या चिरून एकमेकांवर सारख्या बसवून त्यांवर माती सारवावी. दोन्ही फांदीतील अंतररस एकजीव करणे हे कलमांतील मुख्य तत्त्व आहे. रोजचे रोज पाणी देणे वगैरे किरकोळ गोष्टींकडे लक्ष्य पुरवीत असावें. काही दिवसांनी रोपट्याच्या कलमांवरील पाने व फांदी कापून टाकावी. कलम घेतलेली फांदी चांगली वाढू लागली म्हणजे मूळ झाडाचा संबंध तोडून टाकावा. या रीतीने तयार केलेली कलमें वाटेल त्या ठिकाणी लावण्यास योग्य होतात. असल्या कलमांत एक फांदी दुसरीवर बसविणे, अथवा एका फांदीचा दुसरीशी एकजीव करणे, हा मुख्य हेतु असतो. साध्या कलमांत फांदीवर फांदी न बसवता फांटा जमिनीत लावून त्यापासून रोपा उत्पन्न करणे हा हेतु असतो. ____डोळे भरणे हाही एक कलमांतील प्रकार आहे. एका झाडाचा डोळा काढून दुस-या सजातीय झाडांत बसविणे म्हणजे डोळे ( Budding) भरणे होय. डोळा काढतांना तो न दुखेल अशी खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी तो बसविण्याचा असेल, त्या जागी चाकूने उभे चिरून साल सुटी करावी. त्या चिरेत तो सरळ बसवून ती चीर सोपटांनी बांधून टाकावी. पंधरा दिवसांनी डोळ्यांतून कोंब वाढू लागतो. मागाहून वरील मूळ फांदीची पाने वगैरे सगळे कापून टाकावे. डोळे भरण्यांत सुद्धां झाड सुधारून त्यास उंची फळे लागावी हाच उद्देश असतो. खरोखर डोळे भरणे, फांदीवर फांदी बसविणे ( Grafting ) ह्या दोहोंत काही फरक नसतो. पहिल्यांत लहान कळी अगर डोळा उचलून दुसऱ्या फांदीमध्ये बसवावा लागतो, पण डोळा अगर कळी म्हणजे मुग्धदशेतील फांदी होय. तेव्हां मुग्ध फांदी दुस-या फांदीवर पहिल्या कलमांत बसवावी लागते व दुसन्यांत पक्की अगर पूर्ण दर्शत असलला