________________
कल्पना. wwwwwwwwwwwwwwmarwari प्रकरण २ रें wwwwwwwwwwwwwwwww कल्पना. सर्वसाधारण वनस्पतिसंबंधी कल्पना अशी आहे की, बी जमिनीत पेरून रुजलें म्हणजे त्याचा लहान रोपा तयार होतो. मुळ्या जमिनीत जातात. बुधा जमिनीबाहेर वाढतो; व बंध्यावर पानें, डाहळ्या, फुले व फळे क्रमाक्रमाने येत जातात. फळामध्ये बी तयार होते, म्हणजे बी पेरल्यापासून बी तयार होण्यास वनस्पतीची निरनिराळी वरील स्थित्यंतरें होत जातात. शिवाय मुळ्या, खोड, पाने, डाहळ्या, फुले व फळे सर्व मिळून एक पूर्ण वनस्पति बनली असे समजण्यांत येते, जसे आंचा वगैरे. मोहरी:-मोहन्या जमिनीत पोरिल्या असतां प्रथम दोन लहान पाने दिसू लागतात. हळूहळू त्यांचे खोड वर येते व पाने मोठी होतात. पढ़ें तो रोपा वाढून त्यावर नवीन पाने व डहाळ्या येतात व शेवटी पिवळी फुले येऊन त्यां पासून शेंगा तयार होतात. शेंगा सोलून पाहिल्या असतां आंत पूर्वीप्रमाणे मोहन्या आढळतात. इतक्या गोष्टी होण्यास तीन माहने लागतात. म्हणजे एवढ्या अवधीत मोहरीचे जनन, वाढ व मरण ही पुरी होतात. मोहरी ही वनस्पति उच्च वर्गापैकी असून तिजवर सर्व अवयवें आढळतात.. आकाशवेलः-आकाशवेल अथवा अमरवेल नांवाची वनस्पती पुष्कळांनी झाडांवर लोंबत असलेली पाहिली असेल. तिचे लोंचते पिवळे तंत झाडांवर पसरले असतात; व कांहीं जागी झाडांच्या डहाळ्या सभोवती तिचे धागे गंडाळले असतात. ह्या वनस्पतीचा जमीनीशी संबंध नसतो. पाने अथवा इतर अवयवें पूर्णावस्थेस पोहोचलेली नसतात. बहुतकरून पाने येतच नाहीत. आलीच असली तर ती फार लहान असून, तुरळक असतात. ऋतूमध्ये त्यांस फुले येऊन त्याची फळे तयार होतात. व फळांत बीजें सुद्धा वाढतात. पण वहुतकरून ह्यांची उत्पत्ति बीजांपासून होत नाही. कारण त्याची नुसती एक फांदी जरी दुसरे झाडांवर पडली तरी ती जीव धरते, व त्यांतून नवीन मुळे फुटून दुसरे झाडाचे शरीरांत ती घुसतात, व तेथून अन्न शोषण करून आपला