________________
जनन Germination. उदाहरणांवरून वनस्पतींसंबंधी किती वैचित्र्य आहे हे वाचकांच्या लक्ष्यांत येईल. त्यांचे अस्तित्व पाण्यात, हवेत, जमिनीवर, अंधारांत, सूर्यप्रकाशांत वगैरे सर्व ठिकाणी असू शकते. त्यांचा आकार रेणूपासून वृक्षासारखा असू शकतो, त्या स्वावलंबी अथवा परावलंबी असू शकतात, व त्यांचे रंग वेगवेगळे असतात. प्रकरण ३ रें. जनन. Germination. वाल अथवा पावटा.--पावट्याचे बी घेऊन बाह्य निरीक्षण केले असतां असे आढळून येईल की, बाहेरील बाजूस पांढुरकी त्वचा असून एका बाजूस पांढरा लहान पट्टा असतो. एक दोन दिवस पाण्यात भिजत घातलेला पावटा फुगून त्याची बाह्य त्वचा अगदी सुटी होते. टरफल सोलून काढिले असतां परस्परांस चिकटलेल्या दोन डाळिंबी, आंतील अंगास आढळतात. टरफल काढावयाचे पूर्वी जरा बोटाने दाबिलें असतां पांढ-या पट्ट्यापाशी आंतून पाणी बाहेर येते. हे पाणी एका छिद्रांतून येत असते. डाळिंबी उकलून पाहिले असतां मध्यभागी एक कोंब असतो. कोबास दोन अग्रे असतात. पैकी एक अग्र वरील छिद्रांतून निघून खाली जाते, व दुसरें अग्र वर वाढते. डाळिंबीमध्ये पौष्टिक अन्न असतें. बीज उगवू लागले असतां डाळिंबींतील अन्न कमी होत जाते, व त्यामुळे त्यास सुरकुत्या पडतात. वर जाणान्या अप्रावर पाने येत जातात, पण खाली जाणा-या अग्रावर पाने येत नाहीत. प्रथम खालील अग्र, वरील अप्रापेक्षा अधीक जोराने वाढते. खालील अयावर तसेच त्याच्या पोटशाखांवर बारीक केस येतात. पावटा हा द्विदल धान्य वनस्पतिपैकी आहे. कारण त्याच्या बीजांत दोन बीजदलें (Cotyledons) असतात. शिवाय त्याचा वाढता कोंब डाळिं. बीच्या मध्यभागी असतो. ही स्थिति द्विदल धान्य वनस्पतीच्या बाजांमध्ये नेहमी आढळते. खाली जाणारा कोंब बीजछिद्रांतून ( Micropyle) बाहेर पडतो, हे लक्षात ठेविण्यासारखे आहे. बीजांतील अन्न बीज उगवू लागले