या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ थें]. मूळ Root. असून तो योग्य परिस्थितीमध्ये ठेविला असता त्यास जागृती मिळून तो जोमाने वाढू लागतो... . प्रकरण ४ थे. मूळ Root. बीजापासून जमिनीत घुसणारा कोंब हा आदिमूळ ( Radicle) होय. त्यावर पुढे फांया फुट्न पुनः फांद्यांवर पोटफांद्या येतात. मुळांचे अथवा फांद्यांचे अग्रांजवळ बारीक केस येतात. हे कॅस मुळास फार उपयोगी पडतात. ह्यांच्या द्वारें मुळे जमिनीतून पाणी व अन्नद्रव्ये शोषण करितात. मुळांवरील फांद्या अथवा पोटफांद्या यांचे बारीक निरीक्षण केले असतां आपणांस असें आढळेल की, त्या फांद्या जणूं मुळांचे अंग फोडून बाहेर आल्या आहेत. फांद्यांची उत्पत्ति बाह्य नसून आंत खोल असते. अशा फांद्यांपैकी एखादी सरळ उपटली असतां मुळावर छिद्र पडलेले आढळते. त्यावरून स्पष्ट खात्री होते की, फांद्यांचा उगम खोल आहे. - .. मूलावरण ( Rootcap )-मुळांच्या अग्रांवर जाड पापुद्र्यांचे वेष्टण असते. ह्या वेष्टणाचा मुळास उपयोग असतो. मुळाचा वाढता बिंदू ( Growing point) ह्या वेष्टणामुळे रक्षिला जातो. हे वेष्टण निरनिराळ्या मुळांत निरनिराळ्या प्रकारचे आढळते. कोवळ्या मुळांत पिंगट रंगाचें वेष्टण असते. कधी कधी वेष्टणांचे पुष्कळ पापुद्रे मिळून जाड टोपीसारखा आकार मुळाचे अग्रासभोवती आला असतो, ह्यास मूलावरण ( Rootcap ) म्हणतात. मुळे जमिनीत वाढू लागली म्हणजे साहजिक ती जमिनीच्या खरखरीत भागांत घुसतात. त्यांचा खरखरीत भागाशी संबंध असल्यामुळे मुळाशी अमें झिजून जातात; व असें झिजणे चालू राहिले तर आंतील वाढत्या अग्रास नुकसान पोहोचण्याचा संभव आहे. नुकसान पोहोचणे म्हणजे एक परीने झाडाच्या अवयवांपैकी एकास व्यंग करणे होय. अग्रे झिजू नयेत, म्हणून हे पापुद्रे अथवा त्यांवरील वेष्टणे ह्यांची योजना परमेश्वराने केली असते. हे पापुदे झिजून गेल्यावर आंतून नवीन पापुद्रे येण्याची व्यवस्था होत असते,