वनस्पतिविचारः [प्रकरण mmmmwwwww wwwwwwwww. व येणेप्रमाणे वाढत्या बिंदूचे रक्षण होतें. वरचेवर नवीन पापुद्रे उत्पन्न करण्याचे काम वाढते अग्र करितें. केवड्याचे झाडावरील लोंबत्या मुळांवर टोपीसारखें स्पष्ट आवरण असते. कित्येक मुळांत अग्र नुसतें सुजलेलेंसे वाटते व हा सुजवटा संरक्षक पापुद्र्यामुळे येतो. मुळांचे प्रकारः-मुख्य मूळ नेहमी बुडाकडून अग्रांकडे निमुळतें असून जमिनीत सरळ घुसत जाते. त्यावरील फांद्याही त्याच प्रमाणे अयाकडे निमुळत्या असतात. कित्येक वेळां मुख्य मुळास 'किंकरी मूळ' (Tap root) ह्मणतात. कारण ते सुताराच्या किंकराप्रमाणे जमिनीत भोंक पाडून शिरते. कित्येक वनस्पतींमध्ये मुख्य मूळ सरळ जमिनीत न घुसतां त्या ऐवजी पुष्कळ लहान लहान तंतुमय मुळांचा पुंजका जमिनीत शिरतो. तंतुमय मुळे बहुतेक सारख्या आकाराची असून त्यांमध्ये मुख्य मूळ असें कोणतेंच नसते. अशी मुळे एकदळ धान्य-वनस्पतींमध्ये नेहमी आढळतात. एकदळ धान्य-वनस्पति ओळखण्याची ही एक खूण आहे. जेव्हां केवल रोपा पाहून एकदल अथवा द्विदल धान्यवनस्पति ठरविण्याची असते, अशा वेळेस मुळे जर तंतुमय असतील तर वनस्पति एकदल असते. तृणजातीमधील वनस्पति, कांदे, लसूण, ताड, माड वगैरेमध्ये मुळे तंतुमय असतात. त्यांवरून ही सर्व उदाहरणे एकदलधान्यवनस्पतिवर्गीपैकी आहेत, हे निराळे सांगणे नको. आगंतुक मुळेः-नेहमी सर्व मुळे जमिनीत मुख्य मुळापासून उत्पन्न होतात, असें नाही. पुष्कळ वेळां खोड, फांद्या, तसेच पाने, ह्यांपासून मुळे फुटतात, वडाचे झाडामध्ये बुंध्यापासून अथवा फांद्यापासून निघणारी मुळे नेहमी पाहण्यांत येतात. ब्रह्मी, स्ट्रॉबेरी, दुर्वा वगैरे वनस्पतींमध्ये फांद्यांपासून नवीन आगंतुक मुळे निघतात. पानफुटीमध्ये पानांच्या कडांपासून नवीन कळ्या उत्पन्न होऊन जेव्हां जामिनति रुजतात त्यावेळेस त्यांपासून मुळ्याही सुटतात. त्यावरून न्यास 'पानफुटी अथवा पर्णफुर्टी, हे नाव पडले. ही मुळेसुद्धा जमिनीत घुसणाऱ्या मुख्य मुळाप्रमाणे वनस्पतीस उपयोगी पडतात. काही ठिकाणी मुख्य झाडास बळकटी अशा मुळांकडून मिळते. ह्यांचे द्वारे कांहीं वनस्पति अन्नग्रहण करितात, व काही आपल्या मुळांत अन्नतांठा करितात. सारांश मुख्य मुळे व ही आगंतुक मुळे ह्यांमध्ये फरक काही नसतो.
पान:वनस्पतीविचार.djvu/46
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही