________________
स्कंद अगर खोड Stem, पार्ने, कळ्या वगैरे गोष्टी खोड ठरविण्यास ज्या अवश्य पाहिजेत त्या सर्व येथे आढळतात. म्हणून जरी असली खोडे जमिनीत वाढतात, तथापि त्यांस मुळ्या न समजतां खरें बुंधे आहेत असे समजावे. ग्रंथीकोष्ठः-(Tuber) बटाटे, गोराडू, हातिचक इत्यादिकांचे खोड दोन प्रकारचे असून एक जमिनीत व दुसरे हवेमध्ये वाढते. बटाट्याचा रोपा मुळ्यांसहित उपटून पाहिला असता असे आढळेल की, जमिनीबाहेर हिरवट रंगाचे खोड असून आंत गांठीसारखे भाग पांढन्या फांद्यांच्या अग्राजवळ वाढले असतात. प्रथम जमिनीमध्ये पांढरी फांदी थोडी वाढून तिची अमें सुजूं लागतात व वाढतां वाढतां त्यांचे वाटोळे गोळे बनतात, व हेच वाटोळे गोळे बटाटे होत. बटाट्यावर खोलगटजागेत मुग्ध कळ्या अगर डोळे असून हे डोळे, बटाटे पेरिले असतां उगवतात. बटाट्याची रोपें बी पेरून तयार न करितां हे बटाटे परून नेहमी पीक काढण्याची वहिवाट आहे. बटाट्याच्या फांद्या स्वतंत्ररीतीने अन्न मिळवेपर्यंत त्यांतील सांठविलेल्या अन्नावरच त्यास रहावे लागते. मुळे निराळी असलेली दृष्टीस पडतात. साधारण लोकांचा समज असा आहे की, बटाटे जमिनीत वाढणाऱ्या मोठ्या मुळ्या आहेत, पण त्यावर असणाऱ्या डोळ्यांचा विचार केला असता हा समज चुकीचा ठरतो. गोराडू हातिचक्र वगेरे उदाहरणे ह्याच प्रकारची आहेत. अशा प्रकारच्या जमिनीतील गोळ्यासारख्या खोडास 'ग्रंथीकोष्ठ, (Tuber) असे म्हणतात. सकंदकोष्ठः-(Corm) सुरण, आळवाचे गड्डे, घुया किंवा बंदा वगैरेमध्ये खोड वरीलप्रमाणे जामिनीत वाढून चांगले पोसते. तसेच हवेमध्ये वाढणारी निराळी, हिरवी फांदी असून, त्यावर पाने येतात. जमिनीत खोडावर प्रत्येकी तीन किंवा चार उभे डोके वाढून त्यावर संरक्षक आवरणेही येतात. बटाट्याप्रमाणे येथेही अन्नाचा सांठा केलेला असून भाजीमध्ये ह्यांचा उपयोग होतो. खालील बाजूकडे मुळ्या असतात. अशा प्रकारच्या खोडास 'सकंदकोष्ठ ' (Corm) म्हणतात. कोकस, ग्लॅडिओलसू वगैरे उदाहरणे या सदराखाली येतात. कंदः-(Bulb) कांदे, लसूण, केळी, चवेळी वगैरेमध्ये बुंधा कोठे आहे, हैं प्रथम समजत नाही. तो मध्यभागी असून त्यावर पानांची आवरणे गुंडाळलेली असतात. आवरणे व पाने सोडवून टाकिली असता आंतील बुंधा दृष्टीस पडतो,