या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.५ वें.]. स्कंद अगर खोड Stem. maniawaanaaraamaana असते. म्हणूनच पानाचे ऐवजी ह्या जाड भागांत तो रंग उत्पन्न करून त्याकडून पानाचे काम करून घेणे अवश्य झाले. ह्याच प्रकारची बागेमध्ये शोभेकरितां लाविलेली झिलोफोलिया नांवाची रोपे आहेत. येथेही फांद्या पानाप्रमाणे पातळ व रुंद असतात. खरी पाने फांद्यांचे किनाऱ्यावर असून त्याच ठिकाणी फुलांच्या कळ्या अगर फळे येतात. रसकस-(Ruscus) नांवाची ह्या प्रकारचीच एक वनस्पती आहे. येथे साधारण लोकांस जी पाने वाटतात ती खरी नसून पानासारख्या फांद्या आहेत. ह्या पानाच्या मध्यशिरेवर मध्यभागी एक कळी येते. ही कळी पुढे वाढून त्यावर फुले येतात. ह्या कळीमुळे ती खरी पाने नाहीत याची साक्ष पटते. शिवाय खरी पाने पापुद्यासारखी अपूर्ण स्थितीत वरील हिरव्या भागाचे बुडी येतात. अॅस्परॅगसमध्ये अशा प्रकारची पाने आढळतात. असल्या पानाप्रमाणे दिसणा-या फांदीस 'पर्णकोष्ठ' ( Phylloclade) म्हणतात. कंटककोष्ठ-( Thorn ) लिंबू , बेल, ग्लेडिटचिया वगैरेमध्ये पानाचे पोटी कळीचे जागी एक जाड कांटा वाढतो. हा कांटा ज्या अर्थी कळीचे जागी आला असतो, त्या अर्थी तो कळी अथवा अन्य स्वरूप प्राप्त झालेला मुगारा असला पाहिजे. कधी कधी कांटा जास्त वाढन दसरे लहान कांटे अगर लहान लहान पाने त्यावर येतात. एवढेच नव्हे तर फुले व फळेही त्यावर येतात. तेव्हां हे कांटे म्हणजे एक प्रकारच्या फांद्या होत. अशा खोडांस अगर फांद्यास 'कंटककोष्ठ' ( Thorn ) म्हणतात. कंटककोष्ठ ( Thorn), कंटकपर्ण (Spine) व त्वक्कंटक (Prickle) मा तिन्हीमध्ये पुष्कळ फरक आहे. कंटककोष्ट हे खोड अथवा फांदी आहे. कंटकपर्ण हे एकप्रकारचें कांटेरी पान असते. तसेच त्वक्कंटक हे बाह्य त्वचेपासून ( Epidermis) कठीण, अणकुचिदार झालेले भाग आहेत. जसे गुलाबावरील कांटे इत्यादि. हे कांटे झाडून टाकिले असतां गळून जातात. त्यांचा उगम खोल नसून बाह्य असतो. सूत्रकोष्ठ-(Tendril) रुष्णकमळावरील पानाचे पोटी सूत्रे अगर धागे येऊन ते त्यास वर चढण्यास उपयोगी पडतात. कळीचे जागी असले धागे असल्यामळे त्यास फांद्या समजणे योग्य आहे. भोपळे, द्राक्षे वगैरे झाडामध्ये असले धागे येतात. या धाग्यास 'सूत्रकोष्ठ ' ( Tendril ) म्हणतात.