या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें. पर्ण Leaf. प्रकरण ६ वें. पर्ण. Leaf. 1 उत्पत्ती:-बीज रुजलें असतां ज्या एक किंवा दोन डालिंबी दृष्टीस पडतात, त्या बीजस्थितीमधील पानें अगर बीजदले होत. कित्येकवेळां त्या डाळिंब्या मोठ्या वाढून हिरव्या रंगाच्या होतात. जसे-एरंडी, भोपळा, वगैरे. अशा ठिकाणी बीजदलें हीच रोप्यावरील पहिली पाने होत. महत्त्वः-वनस्पति चरित्रांत पाने मोठ्या महत्त्वाची आहेत. पानाशिवाय पुष्कळ वनस्पतींना हवेतून कार्बन आम्ल शोषून घेता येणार नाही, व कार्बन आम्लाचे विघटीकरण होऊन कार्बन संस्थापन होणे वनस्पति पोषणास अवश्य असते. म्हणूनच वनस्पति आयुण्यक्रमात पानाचे एवढे महत्त्व असते. खोडावर दोन प्रकारची उपांगें असतात. पैकी काही सादृश असून काही असादृश आहेत. सादृश उपांगें म्हणजे खोडावरील फांद्या व असादृश उपांगें ही खोडावर येणारी हिरवी पानें होत.. खोडावरील ज्या भागापासून पाने निघतात त्यास कांडे (Node) अशी संज्ञा आहे, व दोन कांड्यांमधील भागास 'अंतरकांडे' (Inter-node) अगर पेर म्हणतात. प्रत्येक पानास बूंड, अग्र, दोन बाज, तसेंच कडा असतात. साधारणपणे पानास दोन पृष्ठभाग असतात. पण काही पानांत ह्यास अपवाद आढळतो. कारण त्या पानाचे किनारे जमिनीकडे किंवा आकाशाकडे वळलेले असतात, म्हणून असल्या पानास वरचा पृष्ठभाग अगर अध: पृष्ठभाग नसतो. जसे, युकॅलिप्टस्.. - कळी:-पानाचे पोटांत ( Axil ) नेहमी एक कळी अगर मुगारा असतो असा साधारण नियम आहे. पुष्कळ वेळां मुगारे अगर कळ्या कमी अधिक आल्यामुळे त्यांची जागा बदलते. पाने कधी कधी उमलल्याबरोबर गळून पडतात, व कधी पुष्कळ दिवस राहतात. काही पाने एक ऋतूपर्यंत टिकतात, व पुढे गळू लागतात; व कांहीं