________________
७ वें.] पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm). ५३ anawarnaron पुढे सरकतात. अशा वेळेस त्यापासून बारीक केंसासारखे भाग (Cilia) उत्पन्न होऊन ते वल्याप्रमाणे पेशींस पाण्यांतून जातांना उपयोगी पडतात, काही ठिकाणी पेशीस स्थलांतर करण्यासारखी गति न मिळतां पेशीपासून जरूरीच्या प्रसंगी कॅस बाहेर उत्पन्न होतात, व पुनः ते केस पेशीत परत घेता येतात. केस आवरून धरणे अथवा बाहेर सोडणे, हे त्याच्या मर्जीप्रमाणे तसेंच जरूरीप्रमाणे घडत असते. अशा प्रकारची सूक्ष्मगती क्षुद्रवर्गीय प्राण्यामध्येसुद्धा आढळते. जसे, अमिबा प्राणि आणि एकपेशीमय वनस्पति ह्यांचा परस्पर भेद ओळखणे मोठे कठीण असते. . ___सजीवतत्त्व आपल्या चैतन्य शक्तीमुळे केवळ सचेतन शरीरें उत्पन्न करिते. एवढेच नव्हे तर शोषित निरिंद्रिय द्रव्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार करणे हे काम सारखें सुरू असते. निरिंद्रिय पदार्थ प्रत्येक सजीव पेशीत थोडें बहुत प्रमाणांत आढळतातच. हे सेंद्रिय पदार्थ निरनिराळ्या घनतेचे असून निरनिराळ्या रीतीनें आपआपलेपरी वनस्पतीस उपयोगी पडतात. काही अडचणीचे प्रसंगी उपयोगी पडावेत म्हणून वनस्पति त्यांचा सांठा आपले शरीरांत निर्भय जागी करितात. मुळे, खोड, पाने अथवा बीजें, ही साधारणपणे वनस्पतीची सोई. प्रमाणे अन्न सांठवण करून ठेविण्याची कोठारे आहेत. पेशी द्रव्ये:-या सेंद्रिय द्रव्यांत कांही द्रव्ये नेहमीं पेशी रसामध्ये विरघळून त्याशी एकजीव झाली असतात, व काही द्रव्य न विरघळतां पेशीमध्ये अलग राहतात. ह्या न विरघळणा-या पदार्थाचाच बहुतकरून सांठा केला असतो. कारण तात्काल उपयोगी पडणा-या व विरघळणा-या पदार्थापासून सजीव तत्त्व जीवन कण तयार करितें, व त्यापासून पेशीभित्तिका अगर पेशीरचना घटत जाते. साखर, सेंद्रिय आम्ले, त्यांचे क्षार, नायट्रोजनयुक्त शरीरे वगैरे पदार्थ तात्काल उपयोगी पडणारे असून पेशी रसांत सहज विरघळतात. बहुतकरून ते विरघळलेल्या स्थितीत असतात. सत्व, तेल, टॉनिन, काही विशिष्ट रंग वगैरे पदार्थ दुसऱ्या वर्गापैकी आहेत. पैकी सत्व, चरबी व तेल हे विशेष महत्त्वाचे आहेत. साधारणपणे ते सर्व पेशींमध्ये आढळतात. मात्र त्याचें प्रमाण निरनिराळ्या वनस्पतींमध्ये निराळे असतें. सत्त्वाची घटकद्रव्ये कारबन, हायड्रोजन व ऑक्सिजन आहेत, हे पूर्वी सांगितलेच आहे. पेशी घटकद्रव्ये