________________
वनस्पतिविचार. [प्रकरण naramannam जातात. प्राणिवर्गास गुदद्वारांवाटे विष्ठेत, मूत्राबरोबर, घामांत अथवा श्वासोश्वास क्रियेंत निरुपयोगी त्याज्य पदार्थ बाहेर टाकितां येतात; पण अशी सोय वनस्पतिशरीरांत नसल्यामुळे ह्या रीतीने ते पदार्थ टाकणे भाग पडते. केंद्रः-पेशीच्या प्राथमिक स्थितीत सुद्धा तिच्या आकारमानानें केंद्र मोठे असतें. पेशी वाढू लागली असतां तीबरोबर तें वाढत नाही. बहुतेक केंद्र पूर्वीसारखेंच असते. पेशींत केंद्र असणे हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. केंद्रामध्ये सुद्धां चलनशक्ति असते. कारण केंद्र आपले मूळस्थान बदलीत असते. केंद्राची घटकद्रव्ये सजीव तत्त्वासारखीच असून ती त्यापेक्षा अधिक घन असतात; ह्यामुळे केंद्र स्पष्ट ओळखितां येते. केंद्रासभोवती सजीव कण असतात, पेशी विभागः-एक पेशी किती मोठी वाढली,तथापि त्यापासून वृक्ष थोडाच बनूं शकेल ? व्यक्ति मात्र पेशी वाढणे ज्याप्रमाणे जरूर आहे, तद्वत्च पेशींची संख्या अधिक वाढणे अत्यंत जरूरीचे आहे. पेशींची संख्या वाढून जेव्हां पुष्कळ पेशी-जालें (Tissues) बनतील त्यावेळेस कदाचित् मोठे वृक्ष बनण्याचा संभव असतो. वृक्षांची वाढ पेशींच्या नवीन वाढीवर अवलंबून असते. ह्या वाढीस अन्न, पाणी, हवा, तसेंच सूर्यप्रकाश इतक्या गोष्टींची आवश्यकता असते, बीज पेरुन त्यांतील गुप्त सजीव तत्त्व जागृत झाल्यावर पुढे त्याच्या चैतन्य शक्तीने नवीन पेशी उत्पन्न होतात. नवीन उत्पन्न झालेल्या पेशीपासून पेशीविभाग होऊन त्याच्या लाखों पेशी तयार होतात. येणेप्रमाणे बीजापासून तयार होणाऱ्या रोपड्यास कालगतीने वृक्षासारखे मोठे स्वरूप प्राप्त होते. पेशींची वर्धकशक्ति प्राथमिक स्थितीत अधिक असते. नवी पेशी उत्पन्न होण्याचे प्रकार पुष्कळ तन्हेचे असतात. शिवाय नवीन पेशी उत्पन्न होऊन सगळ्या एकाच जीवाकरितां अन्नग्रहणादि क्रिया करीत राहतील, तर एक वनस्पति वाढत जाते असे म्हणता येईल. पण जेथें नवीन पेशी उत्पन्न होऊन प्रत्येक स्वतंत्र रीतीने आपला जीवनक्रम चालवू लागते, त्या ठिकाणी निराळ्या व्यक्तींची उत्पत्ति होत असते. बीजापासून मोठी वनस्पति तयार होणे म्हणजे लाखों नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यांचा संघ एकाच वनस्पतींत एकवटून राहणे होय. तसेंच एक जीव कायम राखणे व त्या जिवाच्या जीवनाकरितां सारखी खटपट करणे, हा उद्देश त्या सर्व पेशीसंघाचा असतो; पण किण्व (Yeast)