________________
८ वें].. पेशीजाल ( Tissue). rrrrrrrrrrrrrrrrrrrr name पौष्टिक असून कधी कधी आपोआप बाहेर गळलेला आढळतो. हा रस बाहेर वायां गेला असतां शरीरसंवर्धनदृष्टया तितका वनस्पतींचा तोटा होतो. कधी कधी हा दुग्धरस विषारी असतो, व त्याबरोबर निरुपयोगी द्रव्येही वाहू लागतात. व्यवहारामध्ये त्या दुग्धरसाचा फायदा होतो. त्यापासून व्यापारी जिन्नस तयार होतात. जसें अफू, रबर वगैरे. पिंडजालः-कांही वनस्पतीमध्ये सुवासिक तेले, तसेंच साखरेसारखे गोड रस उत्पन्न करणाऱ्या पेशी आढळतात. आता ही गोष्ट खरी की, अशा पेशींचें अस्तित्व सार्वत्रिक नसून, काही विशिष्ट ठिकाणीच असते. असल्या पेशींचा एकत्र संघ झाला असता त्यास पिंडजाल (Glandular Tissue ) म्हणतात, ह्या पेशीमध्ये सजीव तत्त्व कणीदार असून त्यांच्याच चांचल्यशक्तीमुळे ही द्रव्ये तयार होतात. पिंडजालाचा पेशीमध्ये पोकळ्यांशी संबंध येऊन पिंडांतून उत्पन्न होणा-या पदार्थाचा सांठा ह्या पोकळ्यांत केला जातो. चोहोबाजूंनी वरील पेशी असून मध्ये पोकळी राहते, व ती पोकळी वाढत वाढत मोठी होते. फुलांतील मधुर रस, पानांतील तेले अथवा मेण, खोडांत आढळणारे धूपादि पदार्थ, केसांतील संरक्षणाकरितां उपयोगी पडणारा विषयुक्तरस, वगैरे पदार्थांचा उगम पिंडापासून होतो. फुलांतील मधुररस, फुलपांखरें चाखण्याकरितां येतात व त्यापासून केवळ स्त्रीकेसरफुलांची गर्भधारणा होते. कारण, पांखरें स्त्रीकेसर फुलांवर बसून परस्परांचा फायदा करून देतात. किडे, मुंग्या, अगर कीटक जेव्हां वनस्पतीस त्रास देऊ लागतात, त्यावेळेस त्यांचे विषारी कस त्यांस बोचलें असतां कीटकास वेदना होतात व त्यामुळे ते पुनः वनस्पतीस त्रास देण्याचे भानगडीत न पडतां दूर जातात. राळ, मेण, धूप, डिंक वगैरे पदार्थ व्यापारीदृष्ट्या उपयोगी पडतात. पेशी जालाची रचना व मांडणी काही विशिष्ट प्रकारची असते. प्रत्येक प्रकारच्या पेशीजालास काही विशिष्ट काम करावे लागते व त्या कामास योग्य अशी त्याची रचना बनते. जरी व्यवस्थित मांडणी झाली असते, तथापि सुद्धा प्रसंगानुसार निरनिराळ्या पेशीजालास आपलों कामें सोडून दुसन्यांची कामें करावी लागतात, अथवा आपली कामें संभाळून दुसन्यास मदत करावी लागते. वाढता कोब:-वनस्पतिशरीरांतील सर्व पेशीजालांचा संबंध वाढत्या कोंबामध्ये तयार होणा-या पेशींशी असतो, अथवा निदान त्यांचा उगम