या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वें]. पेशीजाल ( Tissue ). wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwmar पेशीजालास भिन्नभिन्न स्वरूपें मिळून निराळी पेशीजालें बनत जातात. पेशीस कायमचे रूप मिळाल्यावर तिची वर्धक शक्ति नाहीशी होते. ही वर्धक शक्ति वाढत्या कोंबांतील पेशीत अधीक असते, यामुळे वाढते कोंब सारखे वाढत असतात. ह्याच शक्तीमुळे झाडांचे सर्व अवयव उत्पन्न होतात. जन्या स्थितीत मुद्धा काही विशिष्ट पदरास वर्धक शक्ति असते, म्हणूनच त्या पदरास संवर्धक पदर (Cambium) ह्मणतात. वाहिनीमय ग्रंथीमध्ये Vascular bundle काष्ट व तंतुकाष्ट (xylem &. phloem) पदाराच्यामध्ये हे संवर्धक पदर Cambium आढळतात. ह्या पदरामुळे काष्ट व तंतुकाष्ट अधीक रुंद वाढून त्याबरोबर वनस्पति रुंद होत जाते. पण काही ठिकाणी हा पदर कांहीं काल राहून पुढे नाहीसा होतो. अशा ठिकाणी दुय्यम प्रकारची रुंदीत वाढ होत नसते. हा पदर झणजे पेशी नवीन उत्पन्न करण्याचा एक जण कारखाना आहे. नवीन पेशी उत्पन्न झाल्या असतां काष्टाकडे अथवा तंतूकाष्टाकडे जमत जाऊन दोन्हींचे पदर वाढतात. संदर्धक पदरांत सजीव सत्व व इतर सचेतनकण पुष्कळ असून ते नेहमी चांचल्य स्थितीमध्ये आढळतात. ही दुय्यम संवर्धकशक्ति केवळ ग्रंथीतील संवर्धक पदरामध्येच असते असे नाही. काही ठिकाणी सालीमध्ये ही शक्ति एखाद्या पदरांत उत्पन्न होऊन सालीची वाढ होत जाते. वनस्पतीस दुखापत झाली असतां, अथवा एखाद्याने वनस्पतीचा काही भाग कापून काढिला तर, ती दुखापत भरून काढण्याकरितां अशाच प्रकारची संवर्धकशक्ति दुःखविलेल्या जागी उत्पन्न होऊन हळूहळ नवीन पदर उत्पन्न होतात. येणेप्रमाणे तो दुखापत आपोआप भरून जाते. तात्पर्य एवढेच सांगावयाचें की, गर्भाबरोबर आलेली संवर्धकशक्ति नेहमी वाढत्या कोंबाकडे असते ग्रंथींमधील संवर्धकशक्ति दुय्यम असते. ह्याच दुय्यमशक्तीचा प्रादुर्भाव अवचितप्रसंगी इतर ठिकाणीही दृष्टीस पडतो. पेशी रचनाः-सपुष्प वर्गात तीन मुख्य जाले असून, त्यांच्या तीन विशिष्ट रचना आढळतात:-१ संरक्षक पेशी रचना. ( Tegumentary tissue system ) २ साल रचना. ( Ground tissue system) ३ वाहिनीमय जाल रचना. ( Fibrovascular tissue system ) प्रथम सांगितलेले मृदु पेशीजाल ( Parenchyma) तसेंच दीर्घ पेशी जाल