संघात वेळोवेळी काय काय घडत आहे याची ते माझ्या वडलांकडे चौकशी करायचे. आणीबाणीच्या काळात दीड वर्ष संघाच्या इतर अनेक स्वयंसेवकांप्रमाणे माझे वडीलही कुप्रसिद्ध मिसा कायद्याखाली तुरुंगात होते. त्या काळात जेव्हा जेव्हा वसंतराव मुंबईत यायचे, तेव्हा तेव्हा न चुकता वडील कसे आहेत, घरी सगळं ठीक चाललं आहे ना, याची चौकशी करायचे. त्यानंतर मगच आमचं व्यावहारिक कामांबद्दलचं इतर बोलणं सुरू व्हायचं. पुढे लक्ष्मी स्कूटी बनवायला जेव्हा वसंतरावांनी सुरुवात केली, तेव्हा संघाच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी त्या स्कूटी भेट दिल्याचंही मला आठवतं. वसंतरावांची आणखी एक आठवण म्हणजे कोल्हापूरचे भालजी पेंढारकर आणि वसंतराव हे उत्तम मित्र होते व भालजी हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रांताचे एकेकाळी अध्यक्षही होते.' 33 मुंबईचेच नीलिमा रोडलाईन्स या वाहतूक कंपनीचे मालक उदय पत्रावळी व त्यांचे बंधू महावीर पत्रावळी सांगत होते, “आमचे वडील आप्पासाहेब ऊर्फ विक्रांत पत्रावळी हे जयकुमार यांचे साडू. ते मुंबईला घाटगे-पाटील कंपनीचे चीफ रिजनल मॅनेजर होते. १९५८ मध्ये माझे वडील यांना जॉईन झाले. आप्पा स्वतः व्हेट होते; ह्या व्यवसायाशी त्यांचा तसा काहीच संबंध नव्हता; पण पुढे त्यांनी ह्या व्यवसायाची सगळी माहिती करून घेतली. मुंबईतील कंपनीच्या कार्यालयात आले, तरीही माझ्या वडलांच्या खुर्चीत घाटगे वा पाटील कधीही बसले नाहीत; तो अधिकार फक्त माझ्या वडलांचा, पत्रावळींचा. माझी आई म्हणजे छोटू मावशी. आमच्या घरीदेखील ते प्रत्येक भेटीत येत व त्या वेळी तिलाही ते खूप मान द्यायचे. "वसंतरावांचा कामाचा झपाटा जबरदस्त होता. अर्धा-एक तास तास झोप मिळाली, तरी ते फ्रेश व्हायचे. रोज संध्याकाळी साडेसहा वाजता कोल्हापूरला फोन करायचा त्यांचा शिरस्ता होता. त्यात कधीही हयगय व्हायची नाही. " मुंबईला आले, की वसंतरावांबरोबर आम्ही खूप वेळ एकत्र असायचो, त्यांचं तांत्रिक ज्ञान अगदी पक्कं असायचं. कॅटलॉग्जमध्ये दिलेली सगळी माहिती त्यांना तोंडपाठ असायची. ह्याबाबतीत त्यांची मेमरी अगदी फोटोग्राफिक म्हणतात तशी होती. अनेक ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनवण्यासाठी कंपनीने मूळ परदेशी उत्पादकांशी कोलॅबरेशन केलेलं होतं. कारखान्यातल्या मशीन्सवर स्वतः वसंतराव खूपदा काम उद्योगभरारी । १०९ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१११
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही