पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आलेल्या मुली, जावई, आमच्यापेक्षा मोठे दोन वा तीन नातू, ह्या सर्वांबरोबर हॉलमधील पोपटी-पिवळ्या कोचावर बसलेले, स्वच्छ पांढरे कपडे घातलेले, हातात सोनेरी पिवळ्या द्रव्याने भरलेला, कोरीव काचेचा ग्लास व चेहऱ्यावर तृप्त हास्य असलेले वसंतकाका मला चांगले आठवतात. “त्याच्यासोबतच सकाळी कर्नाटकी पद्धतीचे छान छान नाश्ता वा जेवणातले पदार्थ करण्यात मग्न असलेली आणि दुपार-संध्याकाळ मुलींसोबत रमी खेळत बसलेली माईआजीपण खूप आठवते. त्यांच्या नातवंडांत माझा क्रमांक मुळात सहावा आणि त्यात माझ्या मागोमाग काही वर्षांतच 'घाटगे नातू'चं आगमन झालं असल्यामुळे कौतुक वा लाडांच्या वाटेकन्यांमध्ये माझी पातळी खूपच खाली असायची! तरीपण कदाचित ओरडून घेण्यात व कधीकधी 'आम्ही का नाही असा वाद घालण्यात मात्र ती फार खाली नसावी! “त्यांच्या काही काही गोष्टी विशेषकरून लक्षात आहेत. इंग्रजी पद्धतीचा सकाळचा ब्रेकफास्ट व बरोबर मूठभर औषधांच्या गोळ्या, स्वहस्ते घेतलेली ती इन्सुलिनची इंजेक्शनं, कपड्यांबद्दलची टापटीप, गोल्फला जाताना त्याला साजेसा पेहेराव आणि खास करून गोल्फची टोपी घालून त्यांच्या लाडक्या हिरव्या रंगाच्या 'सोळाशे' गाडीतून जातानाचं दृश्य, मी कदापि विसरणार नाही. “त्यांना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर आणि आपुलकी व माईआजीचा त्यांना मिळणारा पाहुणचार, ह्या साऱ्याच्या लहानपणच्या आठवणी आल्या, की मजा वाटते; पण मोठेपणी त्यांच्या ग्रेटनेसचा खरा बोथ झाला. त्या वेळी मात्र त्यांच्याबरोबर दर्जेदार सहवास न घडल्याची हुरहूर मनात लागून राहिली; परंतु त्यांचा वारसा समर्थपणे चालवत असलेली त्यांची मुलं-मुली म्हणजे माझी आई, मावश्या आणि मामा, आणि विशेष अशा त्यांच्या सुना, म्हणजे माझ्या माम्या ह्यांच्यामध्ये वसंतकाकांच्या व माईआजीच्या सहवासाने उतरलेले वा त्यांना लाभलेले गुण बघायला व अनुभवायला मिळतात. हुशारी आणि आनंदी (केअरफ्री या अर्थाने) वृत्ती असलेलं कुटुंब, खास करून विस्तारित घाटगे कुटुंबात असलेलं प्रेम, कठीण परिस्थितीतून जात असतानाचंही धैर्य, काळानुरूप हसतमुखाने जुळवून घेतलेल्या स्वतःच्या गरजा आणि विलक्षण यशानंतरसुद्धा डाउन टू अर्थ असलेला, जमिनीवर पाय ठेवायला वसंतवैभव | १७० । -