या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ज्ञानार्जनाचीं पांच साधनें.

विकासही पावत नाहीं. अवलोकन हैं सर्वकाळी व सर्व स्थळीं करितां येण्यासारखें असल्यामुळे, त्यापासून सहज पुष्कळ ज्ञाने प्राप्त करून घेतां येतें.
 अवलोकन करण्याची संवय मुलांना लहानपणापासून लागावीं, हाच अवलोकन - शिक्षणपद्धतीचा मुख्य हेतु होय. अवलोकनाची संवय लहानपणापासून लाविली ह्मणजे पुढे ती आपोआप वृद्धिं- गत होते. मुलें लहानपणीं फार जिज्ञासु असतात. कोणतीही गोष्ट पाहिली किंवा ऐकिली ह्मणजे तीं तिजविषयीं साहजिक अनेक प्रश्न विचारतात. अशा वेळी त्यांच्या शोधकबुद्धीस योग्य वळण देऊन, त्यांना अवलोकनाची संवय लावावी. अवलोकनाची संवय लागली ह्मणजे जगांतील ज्ञानभांडार अंशतः तरी त्यांना खुलें झालें असें समजावें. कवि किंवा कादंबरीकार हे ज्या गोष्टी पाहतात, त्यांपासून ते साधारण मनुष्यापेक्षां अधिक ज्ञान संपा- दन करून घेतात. त्यांतील तत्वें शोधून काढतात आणि त्याचमुळे त्यांचे ग्रंथ एवढे हृदयंगम व बोधप्रद होतात. आंग्ल कविवर्य शेक्सपियर यानें एके ठिकाणी हाटलें आहे कीं, " अवलोकनशक्ति ही एक दिव्यदृष्टि होय. ती ज्याला असेल, त्याला दगडाधोंड्यांत, झाडापाल्यांत, प्रत्येक वस्तूमध्ये कांहीं कांहीं दुस-याला दिसत नाहीं, ऐकूं येत नाहीं, किंवा समजत नाहीं, असें दिसतें." पण तें कोणाला ? लक्षपूर्वक अवलोकन करील ज्याला अवलोकन ह्मणजे कार्य ११ जन्मांतही ठाऊक पदार्थसंग्रहालयांत किंवा नंदनवनांत जरी नेऊन ठेविलें, तरी तो बापडा तैथे कार्य अधिक शिकणार आहे !
 झाडावरून फळे पडताना पूर्वी अनेक लोकांनी पाहिली. त्यांत त्याला. नाहीं, अशाला विशेष कांही वाटले नाही. परंतु, असेच फळ पडतांना