या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांचे वाचन.

४७

चांगल्या. त्याच्या योगानें गोषवारा मिळतो व शिवाय त्या ग्रंथाची मीमांसाही होते.
 जॉन मोर्ले- या ग्रंथकाराने एका निराळ्या वाचन- पद्धतीची प्रशंसा केली आहे. तो ह्मणतो कीं, उत्तम पुस्तकाच अभ्यास एकाच वेळी होत नाहीं. तीं पुस्तकें वारंवार वाचावी. वारंवार वाचण्यांत वेळेचा दुरुपयोग होत नाहीं. एक वेळां जी पुस्तकें वाचण्यासारखी असतात, तींच शंभर वेळां वाचलीं असतां वेळेचा दुरुपयोग होत नाहीं.
 ग्रे नामक आँग्लकवि वाचनाचा मोठा भक्त होता. तो नेहमी मेजावर पडून वाचीत असलेला दिसे. लेहंट याचे ग्रंथ वाचणें त्याला आवडत असे. शाळेत असतांनाच त्याला विशेष वाचनाभिरुचि लागलेली होती. एकदां तुरुंगांत असतांनाही त्यानें वाचण्याकरितां काव्यग्रंथ विकत घेतले. तो जरी गरीब स्थितींत होता, तरी पुस्तकें विकत घेण्याकडे तो बराच पैसा खर्च करीत असे. बायरन कवि हा खातेवेळीं, अंथरुणांतसुद्धां वाची. त्याचे वाचन पुष्कळ असून तें सर्व तऱ्हेचे असल्यामुळे त्याला विविध माहिती असे.
 चार्लस डिकन्स. या कादंबरीकारावर लहानपणापासून सरस्वतीचा वरदहस्त होता. त्याची कल्पनाशक्ति विलक्षण होती. प्रवास वर्णनें, कादंबऱ्या व गोष्टी वाचण्याची त्याला विशेष आवड असे. ज्याप्रमाणे शरीराला अन्नवस्त्राची अत्यंत आवश्यकता असते, त्याप्रमाणें तरुण मंडळीच्या कल्पना- शक्तीचा यथायोग्य परिपोष झाला पाहिजे, असें त्याचें मत आहे.
 ह्यूम, स्विफ्ट इत्यादि ग्रंथकारांसही वाचनाची विशेष अभि- रुचि असे. आपल्या ईकडील कालिदास, भवभूति, दण्डी,