या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्मरणशक्ति व ती वाढवावी कशी.

५५

बाचून पाठ कर अधिक चांगले. * या तत्वास अनुसरून पूर्वीची पाठांतर करण्याची पद्धति प्राथमिक शाळांतून बंदे करण्यांत आली असून तिच्या जागीं बालोद्यान शिक्षणपद्धतीचा दिवसेंदिवस अधिक प्रसार होत आहे.बालोद्यान शिक्षणपद्धती- पासून विचारशक्ति वाढत जाऊन स्मरणशक्तीसही चांगली मदत होते.

ऐकलेल्या किंवा वाचलेल्या विषयांवर वादविवाद केला असतां किंवा ते लिहून काढले असतां अधिक ध्यानांत राहतात, सीडायडीस याची भाषासरणी आपणास यावी ह्मणून डिमॉस्थेनिस यानें त्याचा इतिहास आठ वेळां लिहून काढला होता. ऑडिसनच्या स्पेक्टेटर नामक ग्रंथाचा एक भाग बेंजामिन फ्रांक्लीन याच्या हाती पडला, तेव्हां त्या पुस्तकांतील भाषासरणी व विषय मांडणी पाहून आपणासही असें लिहितां यावें, असें बेंजामिन यास वाटलें. त्याकरितां तो त्या पुस्त- कांतील एक एक कलम लक्षपूर्वक वाची व पुस्तक मिटून ठेवून तशाच रीतीनें व त्याच शब्दांनी तो लिहून काढण्याचा प्रयत्न करी. प्रथम प्रथम त्यास चांगलें लिहितां येईना. परंतु पुढें स्पेक्टेटरसारखे लेख तो भराभर लिहून काढू लागला. इंग्लंडांतील सुप्रसिद्ध मुत्सद्दी सर रावर्ट पील हा त्याच्या काळचा मोठा जबरदस्त वादविवाद करणारा असून त्याची बुद्धिमत्ता कशी वाढली, ती गोष्ट येथे अवश्य सांगितली पाहिजे. तो प्रार्थनामंदिरांतून घरीं आला ह्मणजे तूं आज काय


 * टीप:- जें कांहीं पाठ करावयाचे असेल त्याचा अर्थ सम- जून घेऊन नंतर पाठ करावें.

अर्थाविण पाठांतर कासया करावें ।
व्यअर्थीच मरावें घोकोनियां ॥

तुकाराम