या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय.

७१

वाचल्यास त्यापासून मनावर मुळींच सुसंस्कार होत नाहीं व ते वाचण्यांत झालेला कालक्षेपही व्यर्थ होतो. ते ग्रंथ योग्य श्रद्धेनें व एकाग्र बुद्धीने वाचावेत व त्यांवर स्वतंत्रपणे विचार करावा.
 ९. तत्त्वज्ञान -- धर्मान्तरगत तत्त्वज्ञानाचा जो भाग असतो, तो काळजीपूर्वक वाचणें हें प्रत्येकाचे कर्तव्य होय. तसेंच त्यावर मनन करीत गेल्यास धर्माचे रहस्य समजण्यास त्यापासून विशेष मदत होते, यांत संशय नाहीं. तत्त्वज्ञानावर जे आधुनिक काली अनेक प्रकारचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत, त्यांचेही मननपूर्वक अवलोकन करावें. हे ग्रंथ समजण्यास कठीण असल्यामुळे गुरूचें साहाय्य मिळाल्यास ते सुलभ होतात आणि लवकर समजतात. जिना चढतेवेळी आपण सावकाश एक एक पाऊल चढतों, त्या- प्रमाणे तत्त्वज्ञान ग्रंथ वाचतेवेळी एक एक तत्त्व किंवा प्रमेय चांगले समजून घेऊन नंतर दुसरें प्रभेय वाचण्यास सुरवात करावी. अशा रीतीनें अत्यंत काळजीपूर्वक वाचण्याचा क्रम ठेविल्यास हे दुर्बोध ग्रंथ चांगले मनांत ठसतात.
 तत्वज्ञानविषयक ग्रंथ समजण्यास कठिण असल्यामुळे ते लोकांस फार कंटाळवाणे वाटतात. परंतु तत्वज्ञान हें मनुष्याच्या विचारसंग्रहाचें सार असल्यामुळे त्याचा अभ्यास करणें, तें समजावून घेणे, हें अत्यंत श्रेयस्कर होय. तत्वज्ञान है मनुष्याचे जीवन असून त्याचा गुप्त प्रवाह राष्ट्रांतील लोकांच्या आंगी खेळत असतो. वेद, गीता व उपनिषदे यांतील तत्वज्ञानाचा ढसा हिंदुलोकांवर स्पष्ट उमटलेला दिसतो. बायबलांतील तत्वज्ञानास अनुसरून ख्रिस्ती राष्ट्राचे आचार विचार बनले आहेत. तत्वज्ञानांतील तत्वें मनावर पूर्ण विवली हाणजे आंगीं विलक्षण जोम अथवा धैर्य येते.