या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे सोशल मीडियाला जोडल्याने वाचक, लेखक संवाद करता येतो.

  • कोबो

हे प्रकाशन संस्था, मासिके, वृत्तपत्रे यांच्या विवरणिका (Catalogues) पुरविणारे संसाधन ग्रंथपाल, प्रकाशक, संशोधक, चोखंदळ वाचक अशा सर्वांना नवप्रकाशनांची माहिती देणारे साधन.

  • ऑडिबल

ध्वनीफितीरूपात असलेली पुस्तके ऐकण्याचे हे साधन. सुमारे २ लक्ष ध्वनी पुस्तके (Audio Books) यावर ऐकण्यासाठी उपलब्ध. अंधांना वरदान असलेले संसाधन डोळसांना व ऐकू येणा-यांना प्रवासात ऐकता येण्यास उपयुक्त.

  • मून + रीडर

हे अत्यंत विकसित असे वाचन साधन होय. एक तर यावर हजारो पुस्तके वाचनार्थ मोफत उपलब्ध आहेत. या साधनाचे वैशिष्ट्य असे की, ते वाचक सेवी आहे. वाचकांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन ते तयार करण्यात आले आहे. उभे, आडवे ते वाचता येते. अक्षरे लहान-मोठी करता येतात. रात्री वाचता (अंधारात) येते. यात प्रकाशाची स्वयंभू सोय आहे. स्वयंचलित पाने पलटता, मागे-पुढे करता येतात. तुम्ही काय वाचले त्याची नोंद आपोआप घेतली जाते. ती पाहता, तपासता येते. मजकूर अधोरेखित करणे, पुस्तकावर मजकूर लिहिणे (Annotating), वेगवेगळे संदर्भ रंग (पेन) वापरणे इत्यादी सोयींनीयुक्त असे हे साधन जगप्रसिद्ध आहे.

वाचन ११५