या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समर्थ रामदास -
- अक्षरे गाळूनि वाची । का ते घाली पदरिची ।।
निगा न करी पुस्तकांची | तो येक मूर्ख ।।
- दिसमाजी काहीतरी लिहावे ।।
प्रसंगी अखंडित वाचित जावे।।
कुसुमाग्रज -
- ग्रंथ उजळती अज्ञानाच्या
अंधाराच्या राती।
बहिणाबाई -
- अरे छापीसनी आलं, मानसाले समजलं।
छापीसनी जे राहिलं, देयालेच उमजलं ।।
महात्मा ज्योतिबा फुले -
- थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा। तोच पैसा भरा ।।ग्रंथासाठी।।
ग्रंथ वाचताना मनी शोध करा। देऊ नका थारा ।।वैरभावा।।
- पुस्तकांचे मूल्य रत्नांपेक्षा अधिक आहे, कारण रत्नांमुळे बाह्य चमकते तर
पुस्तकांमुळे अंत:करण उज्वल होते.
महात्मा गांधी -
- पुस्तकांची निवड अनुभवी माणसांच्या हाती सोपवणेच शहाणपणाचे.
- पुस्तके ज्ञान प्रसाराचे अमूल्य आणि सुगम साधन होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
- ग्रंथाशिवाय मी जगूच शकणार नाही.
बर्क हेजेस -
- वाचनाची सुप्तशक्ती तुमचं आयुष्य अनेक प्रकारे समृद्ध करते.
- वाचनाने सर्वजण एकाच पातळीवर येतात.
- दुस-या कोणत्याही माध्यमापेक्षा पुस्तक तुमचे आयुष्य घडवू शकते.
- वाचनासाठी काय सबब काढता येईल, याचा सतत विचार करा नि वाचा.वाचन/१३१