हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनंतराव भालेराव


कुणाला पटो अगर न पटो, माझा स्वभाव श्रद्धाळू आहे. मात्र प्रत्येक रंगीत दगडाला देव समजणे मला जमत नाही. दीर्घकाळ घासून, तपासून मगच मी श्रद्धा ठेवतो. यामुळे श्रद्धा बसण्याचे अगर उडण्याचे प्रसंग फारच कमी येतात. पण त्याला इलाज नाही. माझी श्रद्धा विचारांपेक्षा माणसांवर अधिक असते ! मात्र त्या व्यक्तीच्या गुणदोषांची, सामर्थ्य उणिवांची शक्यतो डोळस चिकित्सा मी आधी करून टाकतो. म्हणूनच माणसांचा देव करण्याच्या भानगडीत मी पडत नाही. ही चौकट मान्य करून माझा श्रद्धाळूपणा मी हट्टाने जतन करीत आलो आहे आणि अनंतराव हे माझ्या मोजक्या श्रद्धास्थानांपैकी एक आहेत. त्यांची आणि माझी पहिली साक्षात भेट अठ्ठेचाळीस

साली झाली. नंतर लौकरच या माणसाकडे मी ओढला गेलो. त्याही आधी त्यांचे नाव मी ऐकूनच होतो. हैद्राबादच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रभागी असणारा जो पुरोगामी, लोकशाहीवादी समाजवादी गट श्रॉफ गट म्हणून ओळखला जात असे त्यात अनंतराव महत्त्वाचे नेते होते. खरे म्हणजे त्यांचा पिंड नेत्याचा नाही. वरिष्ठ दर्जाचा, पण अनुयायाचा असा त्यांचा पिंड आहे. नेत्याच्यासारखे मोजून वोलणे त्यांना जमत नाही. त्याप्रमाणे जनतेत तीव्रता नसणान्या प्रश्नांवर तीव्र लिखाण करणे त्यांना जमत नाही. अनंतरावांच्या लेखणीला धार जनतेच्या उग्र संतापातून येते. चळवळीच्या वेळी ते तलवारीने लिहितात. सगळीकडे सामसूम असली म्हणजे मग त्यांची लेखणी