हे पान प्रमाणित केलेले आहे.

३२ : वाटचाल

त्यांनी कधी केली नाही. वेगवेगळ्या अर्थाने माझे मोठे मामा आणि मधले मामा पैशाच्या बाबतीत अव्यवहारी राहिले. मोठया मामांना आपला पगारही पुरला नाही, वडिलांची इस्टेटही पुरली नाही, भावांनी केलेली मदतही पुरली नाही. तेव्हा आर्थिक दृष्टीने ते उदार होते, पण सदैव पैशाच्या चिंतेत असत. दादा याहून निराळे होते.
 आपल्या मोठ्या भावाने आपले शिक्षण केले. त्याच्यामुळे आपण वाढलो, मोठे झालो असे मानून दादांनी स्वतःचा नवा संसार मांडताना प्रथम दोन गोष्टी केल्या. त्यांनी वडील भावाच्या डोक्यावर त्या दिवशी असणारे सर्व कर्ज आपल्या उत्पन्नातून फेडले. वडील भावाला कर्जमुक्त करून वडील भावजयीला सोन्याच्या बांगड्या करून मगच त्यांनी आपला संसार मांडला. आपण असे तुरुंगयात्री, बायकामुलांचा विचार करावा असे दादांनी कधी मानले नाही. मधून मधून धाकटया भावाच्या शिक्षणाचाही पैसा दिला, बहिणीच्या लग्नाला पैसा दिला आणि बापाची स्वतःच्या वाट्याला आलेली सर्व इस्टेट वडील भावाच्या हवाली त्यांनी करून टाकली. बापाची जायदाद तुम्हाला देतो आणि तुमचे कर्ज डोक्यावर घेतो, असा दिलदारपणा दादांच्यामध्ये होता. त्यांनी घर बांधताना वडील भावासाठी आठ हजाराला जागा घेतली, पण वडील मामा म्हणाले, " मजजवळ पैसे सहाच हजार आहेत." उरलेले पैसे स्वत: भरले. दादांनी आपल्या मित्रांना किती मदत केली, याचा तर हिशोबच नाही. त्यांचे एक मित्र असे होते की, दादांनी दरवेळी आपले पैसे खर्चुन त्याचा धंदा काढून द्यावा आगि मित्राने कर्तबगारीने तो बुडवावा. या आपल्या एका प्रिय मित्रासाठी दादा पंधरा-सोळा हजाराला तरी बुडले असतील. राजकीय खटले मोफत, नातेवाईकांना दिलेला पैसा बुडाल्याची तक्रार नाही. मित्रांसाठी किती वूड सोसली याचा पत्ता नाही. असे अनेक बाजूंनी त्यांनी गोळा केलेले धन वाहून गेले. पैशाच्या मागे ते कधी लागलेच नव्हते. त्यामुळे फुकटचे खटले अनेक असत. तरीसुद्धा त्यांना इतके मिळत गेले की, वारा वाटा वाहून गेल्यानंतर जे शिल्लक राहिले त्यात बायकामुलांना खाण्या-पिण्याची ददात कोणतीही नाही. असे यश त्यांच्या हाताला होते.
 इतरांची गोष्ट सोडा, मलाच एकदा ते म्हणाले, " अरे, तू घर बांधतोयस म्हणे." मी म्हणालो, “ तुमचा आशीर्वाद असावा." दादा म्हणाले, " हे पहा, घर बांधताना खर्च नेहमी ठरल्यापेक्षा जास्तच होत असतो. तुला ऐनवेळी पैसे कमी पडतील. मी काही श्रीमंत माणूस नाही, पण तुझ्यासाठी पाच हजार रुपये काढून ठेवतो. गरज पडेल तर मागून घे." हे बोलणे झाले ते त्यांना माहीत की मला माहीत. इतर कुणाला कळणार नव्हते. दादांनी पैसे देण्याचा योग आलाच असता तर मी पैसे घेतले, हेही कळले नसते. ते फेडले की बुडवले हेही कुणाला कळले