पान:वामनपंडित १८८४.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालंकार कवितेचें सत आहे. ( ११० ) लावण्य अधिक देदीप्यमान भा- उत्तरगोग्रहणांत उत्तराचें, युद्धास जाण्याविषयीं उ त्साहपूर्वक भाषण, बृहन्नडेचें कवचादि धारण, उत्तरेचें भाषण, भयंकर कौरवसैन्यास पाहून उत्तराचें घाबरणें, पळणें आणि बृहन्नडेनें त्यास धरून आणणें, कर्णदु- योधनांनी केलेली गुरुनिंदा व त्यावर कृपादिकांचें भा- पण इत्यादि सर्वच भाग पंतांनी फार मनोहर वर्णन केला आहे. ह्या कवितेचा रसपरिपाक इतका विशुद्ध व अविट उतरला आहे की, त्याचें पुनःपुनः ग्रहण केलें तरी तो कंटाळवाणा न होतां, अधिक आनंददायकच होत जातो असें आह्मास वाटतें. गोपाध्यक्षाचें उत्तराशी ! भाषणः - तो राजगृहीं जाउनि राजाच्या उत्तराख्य-तनयातें । नमुनि ह्मणे हो नेतो दुर्योधन धेनु करुनि अनयातें ॥ ४ ॥ गोधन षष्टिसहस्र व्रज ओस करुनि नेतसे कुटिल | लुटिल प्रजाहि जो गो-पीडक तो ब्राह्मणां न कां कुटिल ॥५॥ कवची धन्वी खड्गी व्हा चित्तीं रामचंद्रहि असा ध्या । बैसा रथीं जयश्री गोविप्रावनपरांसि न असाध्या ॥ ६ ॥ हें उत्तराचें भाषण पहाः- उत्तर ह्मणे असें जरि मी एकाकी लहान परि सवतें । यश जोडितोंचि असता सारथि तरि कथन मज न परिसवतें ७ कर्णादिकांसि देता समरी वैराटिकेसरी करिता | जिष्णुपुढें असुरजनीं कोणी वैरा टिके सरी करिता ॥ ९ ॥