पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२२)

आणि ते आणखी काही तरी म्हणजे सुसंस्कृत मन हे होय. अमेरिकन किंवा युरोपियन समाजात ते जास्त आहे. बायकोशी पटले नाही, ती दुसन्यावर मन ठेवू लागली, संसार उध्वस्त झाला, तर सुसंस्कृत मनाला जितका धक्का बसतो तितका असंस्कृत मनाला बसत नाही. म्हणून त्याची आत्मनाशाकडे प्रवृत्ती होत नाही. मात्महत्त्येची जी जी कारणे अमेरिकेत आहेत. ती ती सर्व हिंदुस्थानांतल्या कनिष्ठ जातीत आहेत. तरी येथल्या लोकात आत्महत्या फार कमी आहे ती कारणे येथल्या वरच्या वर्गात पसरल्याबरोबर येथे आत्महत्या सुरू झाल्या. यावरून निघणारा निर्णय फार भयानक आहे, पण त्याला काही इलाज नाही. वर व्यक्तित्वाचे विवेचन करताना जो विचित्र पेच म्हणून सांगितला त्याचेच हे उदाहरण आहे.
 संस्कृति वाढवावी तर मानापमानाच्या कल्पना फार तीव्र होतात. आणि मनातल्या आकांक्षेप्रमाणे जीवितक्रम चालवता येत नसेल, तर मृत्यू बरा, असे वाटू लागते. म्हणजे मृत्यूंत दुःख कमी असे होऊन जाते. सस्कृति न वाढवावी तर पशुस्थिती येते. अस्थिर विवाहस्थिति व पैशाची कमतरता या दोन गोष्टी आत्महत्येस विशेष कारणीभूत होतात. मागल्या काळी सर्व जगातच स्त्रीचे व्यक्तित्व दडपलेले होते म्हणून विवाह स्थिर होते. आणि रोगराई, दुष्काळ वगैरे कारणाने माणसे फार मरत असल्यामुळे जीवनार्थ कलह तेव्हा इतका तीव्र नव्हता. म्हणून आत्महत्येचे दुसरेही कारण फारसे जारी नव्हते. त्यामुळे सर्व जगातच तेव्हा आत्महत्या कमी होत्या. हिंदूच्या समाजव्यवस्थेशी त्याचा काहीएक संबंध नाही. गेल्या शभर वर्षात युरोपात ही स्थिती पालटली आहे. पशूसारख्या जिण्याविरुद्ध स्त्री बंड करून उठली आणि संपत्ती वाढत असली तरी जीवनार्थ कलह फार तीव्र झाला. आता ही दोन्ही कारणे असूनही आत्महत्त्या वाढल्या नसत्या, पण यांच्या जोडीला समाजांतील स्त्री-पुरुषांत शिक्षणाचा प्रसार झाला व प्रत्येकाच्या व्यक्तित्वाची किंमत वाढली. आणि त्यामुळे हीन प्रकारच्या जीवनापेक्षा मरण पुरविले असे व्यक्तीला वाटू लागले. बायको दुसऱ्याबरोबर गेली तर मारपीट करून तिला परत आणणे व पुन्हा कामाला लावणे एवढाच फरक कातकऱ्याच्या जीवितात होतो. पण बायको दुसऱ्याबरोबर गेली तर सुसंस्कृत माणसाच्या जीवितांत अफू खावीशी वाटण्याइतका फरक होतो. हा दोष त्याच्या सुसंस्कृत मनाचा