पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२४)

येथवर दोन प्रकरणांत आपण विचार केला (१) सुख हे ध्येय म्हणून कला- कौशल्यादि साधनांनी मानसिक सुखाची आत्यंतिक वाढ झालेली असणे (२) आत्मरक्षणासाठी समाज अवश्य म्हणून त्यांचे राष्ट्र हे जे परिणत स्वरूप त्यावर लोकांची निष्ठा असणे, (३) आणि मानसिक सुखाचे आद्य साधन जे व्यक्तित्व त्याचा त्या राष्ट्रासाठी किंवा धर्मासाठी बळी दिलेला नसणे, ही कोणच्याही राष्ट्राच्या श्रेष्ठत्वमापनाची साधने आहेत, असे थोडक्यांत सांगता येईल.
 संस्कृती व प्रगथी या संबंधात निर्माण होणाऱ्या कोणच्याही प्रश्नाची उत्तरे आपणास आता देता येतील असे वाटते. माझ्या मताने संस्कृति व प्रगति या भिन्न मानण्याचे मुळीच कारण नाही. शब्दाबद्दल माझा वाद नाही. दोहीचा अर्थ अभिन्न आहे इतकेच सांगावयाचे आहे. आणि त्या दृष्टीने पाहिले तर हिंदुस्थानात मागे संस्कृतीची कितीही वाढ झालेली असली तरी गेली हजार वर्षे हा समाज अगदी हीनदीन स्थितीप्रत जाऊन पोचलेला आहे असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. रामायण, महाभारत, शाकुंतल, ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र, योगशास्त्र, वेरूळ, अजंठा, बरोली ही जर आमच्या गतवैभवाची व संस्कृतीची स्मारके होत, तर तसली एकही गोष्ट गेल्या हजार वर्षात झाली नाही हे त्या काळाच्या अधःपाताचे लक्षण नव्हे असे कसे म्हणता येईल ? आणि सध्याच्या काळी टिळक, गोखले (अमेरिका) रामन्, बोस असे मोठमोठे संशोधक होत असता त्या क्षेत्रांत थोडी प्रगती आहे असे म्हटले तर ते तरी नाकबूल कसे करता येईल ?
 प्रगती हा एक भ्रम आहे असे काही पंडितांचे मत आरंभी सांगितले आहे. पण ते खरे नाही असे आता दिसून येईल. गेल्या चाळीस हजार वर्षात मानवाची मुळीच प्रगती झाली नाही हे म्हणणे बरोबर नाही. मानवाला कोणतेच ध्येय नाही, असे ज्यांचे मत असेल, त्यांना कदाचित् असे म्हणता येईल. पण प्रगती हा शब्दच त्यांना वापरता येणार नाही. पण एरवी गट- भावना किंवा राष्ट्रीय वृत्ती वाढणे, व्यक्तित्वाची जाणीव निर्माण होणे, बुद्धीचा विकास होऊन ज्ञानांत भर पडणे ही निःसंशय प्रगती आहे. नीतिदृष्ट्या विचार केला व गेल्या सातआठ हजार वर्षांचाच विचार केला तर मात्र अल्फ्रेड वॅलेस किंवा डीन् इंग यांचे म्हणणे खरे आहे असे वाटते. म्हणजे