पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३०)

नंदाची लज्जास्पदता जाऊन त्याला मान्यतेची मुद्रा मिळाली तर याहीपेक्षा एक मोठा फायदा होईल. स्त्रीपुरुषांमध्ये प्रेम असेल, भावना व विचार यांची समानता असेल तर सामाजिक दृष्ट्या तर अनेक फायदे होतीलच; पण विषयानंदालाही त्यामुळे जास्त उत्कटता व सुसंस्कृतता येईल, ही गोष्ट विषयसुखाला प्राधान्य दिल्याबरोबर लोकांच्या सहज ध्यानात येईल. तीस वर्षांच्या मुलाने आठ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे, व पतिपत्नीनी दिवसा एकमेकांशी बोलू नये, केवळ रात्रीच त्यांची भेट व्हावी असल्या चाली रूढ असलेल्या समाजात पतिपत्नींच्या समागमाकडे पाहाण्याची दृष्टी किती हीन असली पाहिजे हे काही सांगावयास नको. विषयसुखात केवळ हीन व पाशवी भागच त्यांना माहीत होता. प्रेमाने, भावनांच्या समरसतेने, बरोबरीच्या नात्यामुळे निर्माण होणाऱ्या स्नेहाने, स्त्रीला भोग्य वस्तु न मानता व्यक्ती मानल्यामुळे होणाऱ्या फरकाने, विषयानंदाला किती उत्कटता व श्रेष्ठता येते याची कल्पना जुन्या मताच्या लोकांना कधीच येणे शक्य नाही. आणि हा सर्व विषयसुखाला निंद्य किंवा कमी प्रतीचे मानण्याचा परिणाम आहे.
 विषयानंदाच्यातर्फे आणखीही एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. हे सुख ऐहिक उन्नतीच्या आड तर येत नाहीच; पण पारमार्थिक उन्नतीच्याही ते आड येत नाही. एकनाथ व तुकाराम ही दोन उदाहरणे आपल्यापुढे अगदी स्पष्ट आहेत. 'आत्मा वै पुत्र नामासि । पुत्र झालिया स्त्रियेसी । संग करू नये तियेसी' असे एकनाथांनी सांगितले आहे. तुकारामाने तर बायकापोरांचे एका घाये मडके फोडून टाकण्याचा उपदेश किती वेळा केला असेल विठोबा जाणे. पण वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्याला केलेला उपदेश स्वतः या लोकांनी मुळीच पाळला नाही. हरिपंडित या पुत्रानंतर नाथांना एक कन्या झाली आणि तुकाराम वारले त्या वेळी त्यांची स्त्री गरोदर होती. एरवी याची विचिकित्सा कोणीच केली नसती पण दुसऱ्यांना मडके फोडा म्हणून कडकडून सांगणारे स्वतः काय करतात, असा प्रश्न साहजिकच येतो, असो. स्वतःच्या बाबतीत तुकाराम व एकनाथ यांनी स्वतःचा उपदेश पाळला नाही तरी त्यांना मोक्ष मिळाला हे खरेच आहे. यावरून विषयसुखाची इच्छा मोक्षाच्या आड येत नाही हे स्पष्ट आहे. हे साधुसंत अगदी निर्भमत्वाने भोग घेत होते असेही म्हणता यावयाचे नाही. कारण ते जर मोहातीत असते तर