पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५१)

कमी असण्याचा रतिसुखावर वाईट परिणाम होत नाही, उलट चांगलाच होतो. पण हे सांगताना लोकांनी विपर्यास करू नये म्हणून त्यांनी परिच्छेदाच्या आरंभीच सांगितले आहे की पुढे दिलेल्या गोष्टीचे फक्त साहचर्य मानावे. त्यात कार्यकारण संबंध आहेच असे नाही. (Let us now consider matters related to the lack of climax, but not necessarily causes of it. पृ. ५७७) याचा स्पष्ट अर्थ असा की रतिसुख न मिळण्याचे खरे कारण म्हणजे लहानपणी मनावर त्याविरुद्ध झालेले संस्कार हेच होत. ते जर नसतील तर वयाचा संबंध रतिसुखाशी फारसा येणार नाही. इतके स्पष्टीकरण स्वतः लेखकाने केले असूनही आमच्या जोशीबुवांनी त्याचा विपर्यास करून त्यात कार्यकारण भाव जोडून दिला आहे (पृ. ३४८).
 मॅथू डंकन याचे बाबतीत जोशांनी असाच घोटाळा केला असावा असे वाटते. पंधरा ते वीस हाच आयुष्याचा टप्पा स्त्रीच्या बाबतीत जास्त फलप्रद असतो असे डंकनचे मत म्हणून त्यांनी दिले आहे. (पृ. ३४०) पण डार्विनिझम व रेस प्रोग्रेस या पुस्तकात हेक्रॅफ्ट म्हणतो- Mathew Duncan concludes that women who marry from twenty to twenty four are the most prolific and that, the only period which at all rivals this, is the five years from fifteen to nineteen inclusive (पू: १४४). याचा अर्थ १५ ते २० हाच काळ जास्त फलप्रद असतो असा नसून 'मुख्यतः २० ते २४ हा काळ फलप्रद असतो. व १५ ते १९ हा काळ त्याची बरोबरी करू शकेल' असा आहे.
 Diseases of Women या आपल्या ग्रंथात ब्लॅडसटन व जाइलस् या दोघा डॉक्टरांनी मॅथू डंकनच्या आकड्यांचा उताराच दिला आहे. त्यात १५ ते १९ च्या दरम्यान ज्या स्त्रिया लग्न करतात त्यांच्यात वंध्यत्वाचे प्रमाण शेकडा ७.३ असते आणि २० ते २५ च्या दरम्यान लग्न करणाऱ्या स्त्रियात हेच प्रमाण शेकडा शून्य असते' असे डंकनचे मत म्हणून त्यांनी दिले आहे (पृ. ४०७). डंकनचे पुस्तक आज हातात नाही, म्हणून मी नक्की सांगू शकत नाही. पण जोशीबुवांची विनोदी वृत्ती ध्यानात घेतली व वरील दोन उतारे पाहिले म्हणजे बुवांनी घोटाळा केला असावा असेच वाटू लागते.
 रतिसुखाच्या बाबतीत आणखीही एक महत्त्वाचा विचार डॉ. हॅमिल्टन