पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७६)

करण्यास हरकत नाही, की गोत्रप्रवरांची वस्तुस्थिती पुसट का होईना, पण ज्यांच्या डोळ्यापुढे होती त्यांना सगोत्रविवाह इतक भयंकर वाटत नसे.
 पूर्वीच्या संस्कृत शास्त्रगंथांचा परामर्ष घेऊन हा विचार केला. यावरून एवढे स्पष्ट दिसते सगोत्र किंवा सप्रवर कुलांत पूर्वी कधी तरी समानपूर्वज असला पाहिजे ही कल्पनाच मुळात भ्रामक आहे. आणि मग ज्या कारणासाठी सगोत्र विवाह त्याज्य मानले होते, ते कारणच खरे नाही असे ठरल्याने ती त्याज्यताही नाहीशी झाली पाहिजे हे अगदी उघडच आहे.
 पण करंदीकरांचे हे संशोधन मान्य न करणारे काही पंडित असू शकतील. त्यांनी थोड्या नव्या दृष्टीने विचार केला तर त्यांनाही सगोत्र विवाह हा निषिद्ध मानण्यास मुळीच कारण नाही हे ध्यानात येईल.)
 गेल्या शंभर वर्षात जीवनशास्त्रांत या विषयाचा बराच अभ्यास झाला आहे. त्या शास्त्रांचे या बाबतीत आजचे मत पुढीलप्रमाणे आहे.
 व्यक्तीमध्ये काही गुण असतात काही दोष असतात. अगदी जवळच्या रक्तांत जर विवाह झाला, तर अंगी जे गुण असतील ते जास्त उत्कटत्वाने प्रकट होतात. हा फायदाच आहे पण गुणांप्रमाणेच दोषही प्रबळ होतात हा तोटा आहे. आणि साधारणतः अगदी निर्दोष असे रक्त केव्हाच नसल्यामुळे अगदी लगतच्या रक्तांत म्हणजे भावा-बहिणीत विवाह होऊ देणे इष्ट नाही. सख्खे भाऊ-बहीण सोडून आते मामे नात्यांतले भाऊ-बहीण विचारात घेतले तर तेथेही या प्रकारच्या विवाहांचा परिणाम चांगला होत नाही असे शास्त्रज्ञाचे मत आहे. आते-मामे नात्यातील विवाहामुळे (Cousin Marriages) शुक्रबिंदूतील दोषच संततीत जास्त प्रगट होतात. तेच दोष या मर्यादेच्या बाहेर विवाह केल्यास नाहीसे होतात असे डेव्हनपोर्टचे मत आहे. (हेरिडीटी इन् रिलेशन टू युजेनिक्स् पृ. १८५) वेल्स व हक्स्ले यांच्या सायन्स ऑफ लाइफ या ग्रंथात साधारण असेच मत आहे. (पृ. ३००) साधारण म्हणण्याचे कारण असे की त्यानी पुरावा दिला आहे तो सर्व जवळच्या रक्तसंबंधास अनुकूल असा आहे. पण अर्थात त्यांचे मत त्यांनी दिले ते मान्य केलेच पाहिजे.
 शास्त्रज्ञांचा हा पुरावा पाहिला तर ते जवळच्या रक्तातील विवाहाला प्रतिकूल आहेत असे दिसते; पण हे जवळचे संबंध म्हणणे सख्खे भाऊबहीण