पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९३)

मुळीच दाखविलेले नाही.
 जडसृष्टीपलीकडे काही तरी असले पाहिजे या शास्त्रज्ञांच्या तर्काच्या पुराव्यापेक्षाही एक जास्त प्रबळ व प्रत्यक्ष असा पुरावा अध्यात्मवादाला अलीकडे मिळू पहात आहे. त्याचाही थोडा विचार आपणास केला पाहिजे. पण अध्यात्मिक व आधिभौतिक या मोठ्या सदरातच त्याला घेऊन त्याचा विचार करणे जास्त युक्त आहे. तेव्हा पश्चिमेची व पूर्वेची भिन्न म्हणून जी संस्कृती सांगितली जाते तिचाच आता विचार करू.
 पूर्व व पश्चिम या दोन जगद्विभागांचा विचार करणाऱ्या लेखकांच्या बोलण्यात अध्यात्मिक व आधिभौतिक संस्कृती किंवा त्याहीपेक्षा जास्त स्पष्ट म्हणजे देवी आणि आसुरी संपत्ती हे शब्द नेहमी येत असतात. पूर्वेची संस्कृती अध्यात्मिक असून पश्चिमेची आधिभौतिक आहे व देवी आणि आसुरी अशी विशेषणे देण्याइतक्या त्या भिन्न आहेत असा या बोलण्याचा भावार्थ आहे. आणि पूर्व व पश्चिम यामधील हाच महत्वाचा फरक आहे असे सांगण्यात येते. तेव्हा या देवासुर संपत्तीचा प्रथम विचार केला पाहिजे.
 अध्यात्मिक संस्कृतीची मुख्य खूण म्हणजे मृत्यूनंतरचे अस्तित्व मानणे ही होय. अध्यात्मिक हे नांव आहे तेव्हा आत्मा मानणे या संस्कृतीत अवश्य आहे हे खरे. पण बौद्ध संस्कृतीत तो मुळीच मानीत नाहीत तरी अध्यात्मिक या शब्दाला जो व्यापक अर्थ आहे त्यात ती येऊ शकते. मृत्यूनंतर, देहपातानंतर व्यक्तीचे जीवन तसेच पुढे सुसंगत रहाते की नाही हा प्रश्न केवळ बौद्धिक क्षेत्रातच असता तर त्यावर इतकी रणे कदाचित माजली नसती. पण मृत्यूनंतरचे अस्तित्व गृहीत धरून तेच मुख्य जीवन मानून त्या अन्वये येथले आचारविचार ठरविले पाहिजेत, असे नेहमी सांगितले जाते म्हणूनच या प्रश्नाला महत्त्व आले आहे.
 या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार 'आधिभौतिक शास्त्रांचे अधिकार' आणि 'संस्कृती व प्रगती' या दोन प्रकरणात आपण केला आहे. अध्यात्मिक जगताचे अस्तित्व जिच्या साह्याने आपण ठरवितो ती अंतर्दृष्टी किती पंगू आहे आणि मनुष्याची बुद्धी ही, तिला कितीही मर्यादा पडत असल्या तरी आहे या साधनांत कशी श्रेष्ठ आहे. ते तेथे दाखविलेच आहे. त्याचप्रमाणे कर्मवाद आणि मोक्ष या भ्रामक कल्पनांचीही चर्चा तेथे