पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/12

हे पान प्रमाणित केलेले आहे.


 हें पुस्तक लिहितांना निरर्थक मजकूर न येऊं देण्याची फार काळजी घेतली आहे, यामुळे पुस्तक लहान झालें आहे. तरी स्पष्ट समजूत घालण्यांत कसूर केली नाहीं. चित्रांचे वगैरे डिझाईन करून ते पद्धतशीर मांडण्यास फार त्रास झाला आहे. म्हणून वाचकांनीं हें पुस्तक मनःपूर्वक वाचून त्याचा योग्य उपयोग करून घेतल्यास आमच्या श्रमांचे चीज होईल.

मुंबई, ता० १।८।१९०९.

काशिनाथ गोविंद म्हसकर.

 ग्रंथकर्ता.