पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण 4 थे

ठिकाणीं सांद घालावी. हिलाच लीज असें म्हणतात. सांदीचा उपयेाग फार आहे व ती खालीं लिहिल्याप्रमाणे घालतात.

सांद


 प्रथम हेकफ्रेममधील पहिली वई दाबावी म्हणजे दुसरी वई आपोआप वर सरते व पुढच्या बाजूस पेला पडतो. (सम दो-यांची रांग व विषम दो-यांची रांग यांमधील त्रिकोणाकृती अंतरास पेला म्हणतात.) या पेल्यांतून वईतील सुताहून भिन्न रंगाचा एक जाड दोरा उजवीकडून डावीकडे घालावा व पुन्हां'वया खालीं वर करून पेला बदलावा व दुस-या पेल्यांतून रंगीत दो-याचे डावीकडील टोंक उजवीकडे आणावें आणि रंगीत दो-याच् दोन्ही टोकांस गांठ मारावी.  ही सांद घालणें म्हणजे विणलेल्या कापडांत जसा आडवा दोरा असतो तसाच ताण्यामध्यें एक आडवा दोरा घालणें होय. हा दोरा घातल्यापासून फायदा असा कीं, ड्रमवर सूत गुंडाळलें जात असतांना एखादा दोरा जर तुटला तर तो गुंतून न जातां या सांदीजवळ तरी निदान सांपडलाच पाहिजे. ही दोरा शेोधून काढण्याची खूण ऊर्फ सांद निदान २० यार्डींचे अंतरावर घालात जावें, म्हणजे सुताची गुंतागुंत होणार नाहीं व थोडी झाली तरी दुरुस्त करण्यास जिकीर पडणार नाही.  ताणा तयार करण्याच्या कामांतील प्रत्येक क्रिया फार महत्वाची आहे, व ती फार काळजीपूर्वक केली पाहिजे. यांतील