पान:विद्यार्थि धर्म.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकरावे. ]
सुटी व प्रवास.

१०५


आणखी कांहीं देखावा असल्यास पहाण्याकरितां अवश्य जावें. पोहण्याची सोय नदीकाठच्या गांवाप्रमाणे असेल तर ठीकच नसेल तर विद्यार्थ्यांनीं पांच चार मैल लांब असलेल्या एखाद्या नदीवर, विहिरीवर अगर एखाद्या जलाशयावर पोहावयास जावें. शिकण्या- करितां बाहेरगांवी गेलेल्या विद्यार्थ्यांची स्थिति अर्थातच थोडी निराळी असणार. त्यांनीहि आपल्या भोवतालच्या परिस्थितीला अनुरूप असा नेहमीच्या कार्यक्रमापेक्षा थोडा निराळा कार्यक्रम ठरवावा. सकाळी तास दोन तास खर्चल्याने जर एखाद्या संस्थेचें थोडेबहुत काम होत असेल, तर त्या कामास मदत करण्यास अवश्य जावें. सकाळचा वेळ कौटुंबिक, सामाजिक, आणि सार्व- जनिक कामांत घातल्यावर दोन प्रहरी विद्यार्थ्यांनी जमाखर्च लिहिणें, पत्रव्यवहार करणें, हीं कामें करावीत. तास दोन तास अभ्यासाची चिंतनिका झाली की, विद्यार्थ्यांनी चार दोन मैल फिरावयास जावें. कांहीं विद्यार्थी ह्मणतील कीं, 'अहो सुटीच्या दिवशीं सुद्धां तुझीं कामाला जुंपणार? तो तर आमचा विश्रांतीचा दिवस ! मग इतकी कामे केल्यावर विश्रांति कोठे आहे ? या प्रश्नाचे उत्तर असें आहे कीं, विश्रांति ह्मणजे स्वस्थ बसणें, लोळणे, निजणें किंवा आयुष्यनाश होईल, असें कांहीं तरी करणें, असा अर्थ नव्हे ! कामाचा बदल याचेंच नांव विश्रांति, मनुष्य अगदीं रिकामा केव्हांहि असू शकत नाहीं आणि असणें इष्ट नाहीं. दर- रोजच्या अगदी बांधलेल्या कार्यक्रमापेक्षां सुटीच्या दिवशी मोकळे- पणाने वागावे आणि हौसेनें निराळी कामे करावीं ह्मणजेच विश्रांति मिळते.

 आठ दिवसांच्या सुटीशिवाय मधूनमधून पांचसहा दिवसांच्या ज्या सुट्या येत असतात, त्यांचाहि विनियोग विद्यार्थ्यांनी योग्य असा करावा. मागे राहिलेला अभ्यास वर्गाबरोबर आणणें, किंवा चार दोन दिवसांत कांहीं विषय वाचून एखादा निबंध लिहिणें, चार दोन दिवसांत एकाद्या गांवांला जाऊन एखादे काम उरकतां
१४