पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौदावें. ]
स्वदेशसेवेचा ओनामा

१२७


कांहीं माणसें दंग झालेली असतात, बाहेर राहून नांवें ठेवणारी माणसे फार. पण कार्यात पडून तें उत्तम करून दाखविणारी, निदान कसे करावें हें सांगणारी माणसें फारच विरळा. एका दृष्टीनें सार्वजनिक कार्याचे शिक्षण हे आपल्या लोकांना नवीन असल्यामुळें त्यांत जितकी शिस्त असावी तितकी असत नाहीं. पूर्वीची कार्ये व हल्लीची कार्ये यांमध्ये मोठाच फरक आहे. हल्लींच्या कोणत्याहि सार्वजनिक कार्याला शिस्त घटना व पद्धत पाहिजे. आधींच सार्व- जनिक कार्याकडे लोकांचें लक्ष्य कमी; त्यांत शिस्तीचें बंधन फार जखडूं लागलें तर चालू असलेले सार्वजनिक कार्य बंद पडतें, असेहि अनुभव आहेत. परंतु दिवसानुदिवस वाढत चाललेली सार्वजनिक कार्याची जबाबदारी पाहिली ह्मणजे विद्यार्थिदशेतच सार्वजनिक कार्याचे बाळकडू मिळाले पाहिजे असें वाटतें. हल्ली सार्वजनिक कामे वाढली असली तरी व्याख्यान, पुराण, कीर्तन, सभा, अशा साध्या गोष्टीतही लक्ष घालणारे फारच थोडे लोक आढळतात. प्रत्येक गांवांत कांही ठराविकच माणसें सार्वजनिक कार्य करीत असतात. 'कामांचा सुकाळ व माणसांचा दुष्काळ अशी स्थिति ठिकठिकाणी आढळते. मोठे काम होत नाहीं व लहान कामांत आनंद वाटत नाहीं, ह्मणून कोणतंच काम न करणारे पढे कितीतरी आढळतात. का साधी हाणून दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे लहान काम सुद्धां चांगले होते नाहीं. कर्तव्य बुद्धीने कार्य करण्याची सवय लहानपणापासून नसल्यामुळे त्याचा हा परिणाम होतो. तात्पर्य, लहानपणीच कोणत्याहि सार्वजनिक कार्याचे वळण लागलें पाहिजे. हें विद्यार्थ्यांनी ध्यानांत ठेवून वागावे, एवढेच या प्रकरणाच्या शेवटीं सांगतों.

__________