या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसरी बायको करण्याविषयों पुरुषास जशी आज्ञा दिली आहे तशीच एक नवरा मेला अथवा नपुंसक निपजला वगैरे अडचणींच्या प्रसंगी दुसरा नवरा करण्याविषयी बायकोतही आज्ञा दिली आहे. एकदा विवाह झालेल्या स्त्रीशी पुनः विवाह करणे हा जसा पुरुषाला मध्यम पक्षाचा विवाह सांगितला तसाच एकदा विवाह झालेल्या पुरुषाशी पुनः विवाह करणे हा स्त्रीलाही मध्यम पक्षाचाच विवाह सांगितला आहे. परंतु परुष हा सर्वथा प्रबल पडला. तेव्हां तो आपणास ज्या गोष्टींचा अधिकार घेतो त्याच गोष्टींचा अधिकार गरीब बिचाऱ्या स्त्रिया अबला पडल्या ह्म. णून त्यांस तो देण्यास इच्छीत नाही. त्याने सर्व शास्त्रे आपल्या हातात घेतली आहेत आणि त्यांचे अर्थ व व्याख्या आपल्या सोयीत पडल तशा तो करितो; आपल्या स्वार्थपरबुद्धीमुळे व अन्यायामुळे स्त्रीजाति किती निकृष्ट स्थितीस येऊन पोहोचलो आहे या विषयी त्याच्या मनांत तिलवायही विचार येत नाही. अशा प्रकारच्या अन्यायांपासन हिंदुस्थानांतील अर्वाचीन काळच्या स्त्रियांत जी दखें भोगावी लागत आहेत ती केवळ त्वदय वेधकच आहेत. स्त्री जातीत विशेष सन्मान देणे व तीस उत्तम प्रकारे करून सखी ठेवणे या गोष्टी या आमच्या देशांत अज्ञात आहते हटले तरी चिंता नाही. आणखी उलट असें ही आहे की, जे पुरुष आपणास शाहणे असें मानितात व ज्यांस दसरे लोक ही शाहण्यांत गणतात तेही स्त्रियांची प्रस्तुतची निकृष्ट दशा आहे ती बरीच आहे असे मानितात.