या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ या मंत्राचा भावार्थ असा आहे की, आश्विनीकुमारांचा कोणएिक भक्त त्यांची प्रार्थना करीत असतां ते लवकर आले नाहीत, असे पाहून त्यांस ह्मणतो, अहो अश्विनीकुमारहो, तुह्मीं रात्रौ कोठे असतां ? दिवसास कोठे असतां? कोठे अभीष्टप्राप्ति करून घेता ? कोठे वास करतां ? आपल्या शय्येवर विधवा स्त्री आपल्या दुसऱ्या वराला किंवा साधारण कोणतीही स्त्री आपल्या पतीला संभोगकाली आपणाशी सम्मुख करून घेते, तसा कोणता यागकर्ता पुरुष तुह्माला आपणाशी सम्मुख करून घेत आहे ? या भावार्था वरून सिद्ध होते की, वेदांत विधवेस द्वितीय वर होणे ही गोष्ट अगदी साधारण होती. या ठिकाणी कोणता यागकर्ता पुरुष तुलाला आपणाशी सम्मुख करूनघेत आहे हा दाष्टीत आहे, आणि विधवा स्त्री-पच्या वरास संभोगकाली जशी आपणाशी सम्मुख कर। आणि साधारण कोणती ही स्त्री आपल्या पतीस र जशी आपणाशी सम्मुख करून घेते हे दोन हात आहेत. दृष्टांत देण्याचा मुख्य हेतु असा असतो की, त्याच्या योगाने दाष्टींतांतील विषय स्पष्ट व्हावा. यावरून अर्थात असे दिसते की, दृष्टांत जो देणे आहे तो सर्वांस सामान्यतः समजण्यासारखा अगदी प्रसिद्धच असा असला पाहिजे, तेव्हां विधवेस द्वितीय वर असणे ही गोष्ट प्रसिद्धच असल्यावरून ती येथे दृष्टांतार्थ घेतली आहे. या मंत्राच्या व्याख्येत यास्काने देवर शब्दाचा अर्थ