या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रेय सांगितले ते अगदी असंगत झाले. प्रथम, स्त्रियांचा पुनर्विवाह करणे वैध आहे; दुसरें, पुनर्विवाह करण्यापक्षां ब्रह्मचर्याने राहणे अधिक श्रेयस्कर आहे; आणि तिसरे, सहगमन करणे हे त्याहूनही अधिक श्रेयस्कर आहे; अशा अर्थाच्या तीन वचनांचा परस्परांशी जो अगदी उघ. ड संबंध दिसत आहे त्यावरून असाच सिद्धांत होतो की, . ती तिन्ही वचनें एकाच युगाविषयी आहेत. तेव्हां पुनविवाह जर मागच्या युगांविषयी असें झटले तर ब्रह्मचर्य व सहगमन हीही त्याच युगांविषयों अर्थात झटली पाहिजेत. आणि ब्रह्मचर्य व सहगमन कलियुगाविषयी आहेत असे झटले तर पुनर्विवाहही कलियुगाविषयींच आहे असे सटले पाहिजे. त्या वचनांचा परस्परांशी संबंध नाहींमा झाला असता त्यांच्या अर्थातील मुख्य स्वारस्यच जाईल तात्पर्य, विधवाविवाह हा पूर्वीच्या युगांतला धर्म आहे स्थापन करण्याच्या भरांत माधवाचार्याने केवळ संहिता करणाऱ्या पराशराच्या अभिप्रायासच विरुद्ध व्याख्यान केलें असे नाही तर त्याने आपल्या स्वतांच्या व्याख्यानासही विरुद्ध व्याख्यान केले, हे मागील लेखांवरून सर्वांस कबल केले पाहिजे. जे धर्म आचरण्यास कठिण त्यांजविषयी कलियुगांतल्या लोकांची प्रवात्ति होण्याचा संभव नाही, यास्तव पराशरसंहि. तचा उद्देश असा आहे की कलियुगाकरितां सुखाने आचरण्यासारखे सोपे धर्म सांगावे' असे स्वतः माधवाचर्यानेच सांगितले आहे. त्याप्रमाणे, पुनर्विवाह हा सोपा धर्म ह्मणन