या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

ह्मणजे त्या रूपाला पृथ्वी हें नांव प्राप्त होतें. प्रत्येक कल्पाच्या आरंभी अशा क्रमानें विश्व व्यक्त होऊं लागतें, आणि कल्पाचा अंत होऊं लागला ह्मणजे याच्या उलट क्रमानें तें परत अव्यक्तावस्थेला जातें. कल्पांताच्या वेळीं घन- पदार्थाचें रूपांतर होऊन ते प्रवाही बनतात. नंतर प्रवाही पदार्थ विरल व उष्ण होऊन त्यांचें तेज बनतें. त्या तेजाचा वायु बनतो, व त्या स्थितीत अणूंचें पृथक्करण होतें. इतकी क्रिया पूर्ण झाली ह्मणजे गुणत्रयाची साम्यावस्था होऊन स्पंद बंद होऊं लागतात व ते थांबत थांबत शेवटीं पूर्णपणे बंद होतात; आणि सर्व विश्व अगदीं निष्पंदावस्थेतील आपल्या कारणरूपांत प्रविष्ट होतें. आपल्या या पृथ्वीचें व ती ज्या भोवती फिरत आहे त्या सूर्याचें रूपांतर हळू हळू सुरू असून ही घन पृथ्वी वितळून प्रथम प्रवाही होईल व शेवटीं वायुरूप होईल असा सिद्धांत अर्वाचीन ज्योतिषशास्त्राने सिद्ध केला असल्याचें आपणांस ठाऊक आहेच.
 आकाशावांचून एकटा प्राण कार्यकारी होऊं शकत नाहीं. स्पंद ह्मणजे हालचाल उत्पन्न करणें हेंच प्राणाचें कार्य आहे. प्राणशक्तीच्या स्वरूपाबद्दल याहून अधिक माहिती आपणांस होऊं शकत नाहीं. जेथें कोणत्याही प्रकारची हालचाल दिसेल तेथें तें प्राणशक्तीचेंच रूप आहे असे समजावें. त्याचप्रमाणें प्रत्येक आकाराची जडवस्तु हे आकाशाचें स्वरूप आहे असे समजावें. प्राण- शक्तीला स्वतंत्र असे अस्तित्व असूं शकत नाहीं; अथवा दुसऱ्या कोणत्या- तरी पदार्थाच्या साहाय्याशिवाय ती कार्यकारीही होऊं शकत नाहीं. त्याचप्रमाणें ती कोणत्याही प्रकारच्या स्वरूपांत असली तरी आकाशाशी संलग्न असल्या- शिवाय ती एकाकी राहूं शकत नाहीं. अव्यक्तदशेत ती अगदीं निष्पंदाव- स्थेत असतांही आकाशाशीं संयुक्त असते; आणि विश्व व्यक्त झाल्यावरही ती गुरुत्वाकर्षणादि अनेक रूपांनीं प्रकट झाली तरीसुद्धां, पदार्थाशीं ह्मणजे वस्तुतः आकाशाशीं ती संयुक्तच असते. शक्ति आणि पदार्थ यांस अन्योन्याश्रय आहे. शक्तीवांचून पदार्थ अथवा पदार्थावांचून शक्ति अशा एकाकी स्थितीत तीं कधीही आपणांस आढळत नाहींत. विश्वांत आढळून येणारी दृश्य शक्तीचीं रूपे आणि प्रत्यक्ष दिसणरो पदार्थ हीं अनुक्रमें प्राण आणि आकाश यांचींच जडरूपे आहेत. पदार्थ आणि त्यांतील शक्ति यांची प्रतिक्रांति होऊन तीं अव्यक्तावस्थेस परत गेलीं, ह्मणजे त्यांस आकाश आणि प्राण या मूलसंज्ञा