या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

पण असे झाले तरी त्याबरोबर पूर्वानुभवाचे ज्ञान मात्र नष्ट होणार नाही. यामुळे सध्या आपणाला जग जसे शृंखलेसारखे होऊन बसले आहे, तसे तें त्याला होणार नाही. त्याला पुन्हा कसलेही दुःख प्राप्त होणार नाहीं, अथवा अमुक गोष्ट अनिष्ट आहे असेही वाटणार नाहीं. सामान्य जनतेच्या दृष्टीने दुःखकारक अशी काही गोष्ट घडली, तर ते मृगजल आहे-स्वप्नवत्-आहे असा त्याच्या बुद्धीचा निश्चय होईल. स्वप्नांतील गोष्टींचे सुखदुःख ते काय असणार ? अशा स्थितीला पोहोंचलेल्या मनुष्याला जीवन्मुक्त असे ह्मणतात. जीवन्मुक्त ह्मणजे देहधारी असतांही मुक्तावस्थेत असलेला मनुष्य. चालू आयुष्यांत ज्ञानयोगाचे साध्य ह्मटले ह्मणजे ही जीवन्मुक्तस्थिति प्राप्त करून घेणें हेंच आहे. जीवन्मुक्त पुरुष या जगांत राहिला तरी, त्यांतील वस्तूंशीं तो आसक्त असत नाही. कमळाचे पान पाण्यांत राहूनही जसे ओलें होत नाही, त्याचप्रमाणे जीवन्मुक्त पुरुष जगांत राहूनही, जगांतील वस्तूपासून अलिप्त राहतो. सर्व मानवी प्राण्यांत-किंबहुना सर्व प्रकारच्या प्राण्यांतअसा पुरुष श्रेष्ठ असतो. आपण स्वतः केवलरूप आहों-परमेश्वरस्वरूप आहों, असा अनुभव त्याला झालेला असतो. जोपर्यंत परमेश्वरस्वरूपांत आणि आपणांत थोडेतरी अंतर आहे असे आपणांस वाटत असेल, तोपर्यंत आपण निर्भय झालों असें ह्मणतां येणार नाही, तोपर्यंत आमच्या अंतःकरणांत भीति केव्हां प्रवेश करील याचा नेम नाहीं; पण परमात्मा आणि आपण एकरूपच आहों, आपणांत आणि त्याच्यांत कसलाही भेद नाहीं, किंबहुना आपणच तो आहों असा अनुभव एकवार आला, ह्मणजे भीतीचे ठाणे कायमचेच उठेल. अशा स्थितीत द्रष्टा कोण आणि दृश्य कोण ? पूजक कोण आणि पूज्य कोण ? वक्ता कोण आणि श्रोता कोण ? जोपर्यंत द्वैत शिल्लक आहे, तोंपर्यंतच हे भेद. ६ यत्र हि द्वैतमिव भवति तदितर इतरं पश्यति तदितर इतरं जिघ्रति तदितर इतर रसयते तदितर इतरमभिवदति तदितर इतरं शृणोति यत्र स्वस्य सर्वमात्मैवाभूत्तत्केन कं पश्येत्तत्केन के जिभ्रेत्केन के रसयेत्केन कमभिवदेत्केन के ऋणुयात्” ( बृहदारण्यकोपनिषत् ५.१५). जेथे द्रष्टा आणि दृश्य हा भेद नाहीं, आणि जेथे श्रोता आणि वक्ता हा भेद नाहीं, तेच ब्रह्म. एकवेळ तुह्मी ब्रह्मरूप झाला ह्मणजे सदोदित तुह्मी ब्रह्मरूप राहतां. ५ अशा स्थितीत जगाची वाट काय होईल ? आपणाकडून