या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ६ वें.

१८९


दर्जाचे होते आणि त्याला आपलपोटेपणा हे पापदर्शक नांव प्राप्त होते; तथापि ते प्रेमही विश्वव्यापी प्रेमाचाच अंश असते. विश्वव्यापी आत्मा हा प्रेमनिधान असल्यामुळे आपल्या मनांत कसल्याही प्रकारचे प्रेम अंशतः जरी उद्भवले, तरी ते त्या निधीतूनच आले पाहिजे.
 या आत्म्याची आपणांस ओळख करून घ्यावयाची आहे. ज्यांना अशा प्रकारची ओळख पटलेली नसते, ते अत्यंत मर्यादित स्थितींत राहिले असल्यामुळे त्यांचे प्रेमही अत्यंत मर्यादित होते; आणि त्याला आपलपोटेपणा हे नांव प्राप्त होते. ज्यांना आत्मप्रतीति झालेली असते, त्यांच्या प्रेमालाही मर्यादा नसते. त्यांचे प्रेम विश्वव्यापी असते. त्यांचा आपलपोटेपणा आपली लहानशी मर्यादा टाकून विश्वव्यापी होतो. * की विश्वचि माझे घर । ऐशी मति जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण झाला॥” अशी त्यांची स्थिति होते आणि त्यांना आपण सत्पुरुष ह्मणतों. कोणाचें ब्राह्मणावर प्रेम असतें तें तो ब्राह्मण ह्मणून नव्हे, तर त्याच्या द्वारा जें आत्मबिंबाचे दर्शन होते त्यावरील ते प्रेम असते. ब्राह्मण आणि विश्वात्मा, हे जो वेगळेपणे पाहतो त्याचा ब्राह्मण त्याग करतो. क्षत्रिय आणि विश्वात्मा हे भिन्न आहेत असे जो पाहतो त्याचा क्षत्रिय त्याग करतो. जग आणि विश्वव्यापी आत्मा है भिन्न आहेत असे जो पाहतो त्याचा जग त्याग करते. देव आणि विश्वव्यापी आत्मा यांत भिन्नता आहे असे जो पाहतो त्याचा देव त्याग करतात. सर्व वस्तू निराळ्या आणि विश्वव्यापी आत्मा निराळा असे जो पाहतो त्याचा त्याग सर्व वस्तू करतात. ब्राह्मण, क्षत्रिय, देव, जग आणि इतर सर्व वस्तू, या वस्तुतः आत्मरूपच आहेत. प्रेमाचे स्वरूप महर्षि याज्ञवल्क्यांनी याप्रमाणे सांगितले आहे. प्रेम याप्रमाणे विश्वव्यापी असतां त्यांत आपलपोटेपणाचा भाग कसा निर्माण होतो? माझे प्रेम एखाद्या विशिष्ट स्त्रीच्या ठायीं जडलें आहे अशी कल्पना करूं. ज्याक्षणी मी माझे प्रेम त्या एकाच विशिष्ट व्यक्तीशी जोडले, त्याचक्षणी माझ्यांतील प्रेमाला मर्यादा उत्पन्न झाली. जो पदार्थ समर्याद आहे तो अनंत असू शकणार नाहीं हा तर सिद्धांतच आहे. माझे प्रेम समर्याद झाल्याबरोबर ते अंतवंत झाले, आणि त्याबरोबरच त्याला स्वार्थाचे-आपलपोटेपणाचें-क्षुद्ररूपही प्राप्त झाले. त्याला स्वार्थाचे रूप प्राप्त होण्याबरोबर, त्याचे दुःखांत पर्यवसान होण्याचीही भीतिही उत्पन्न झाली; पण ती स्त्री आत्मरूपच