या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२१५


पाहिजे ही अपेक्षा आहे. धर्माच्या बाबतीतही हेच. अमुक मनुष्य धार्मिक असे आपणांस कोणीं ह्मटलें नाहीं, तर आपला धर्म फुकट गेला असे आपणांस वाटते. तीच गोष्ट प्रेमालाही तंतोतंत लागू आहे. निव्र्याज प्रेमाचे नुसते वारेही आपल्या अंगावरून कधीं गेलें नाहीं. प्रेमांतही आह्मांला अदलाबदलीची-व्यापाराची आवश्यकता वाटावी हे अत्यंत शोचनीय आहे !
 जर तुह्मांला नुसता व्यापार करावयाचा असेल, जर केवळ देवाण, घेवाण करण्याचीच तुमची इच्छा असेल, जर विकणे आणि विकत घेणे हेच तुमचे कर्तव्य आहे असे तुह्मांस वाटत असेल, तर व्यापाराचे सर्व नियमही तंतोतंत पाळावयाला नकोत काय ? “व्यापार करतां सोळा बारा' अशी एक ह्मण आहे. व्यापारांत कधीं तेजीचे दिवस असतात तर कधीं मंदीचे असतात; कधीं खप कमी आणि माल पुष्कळ असे झाले तर दुस-या वेळीं माल थोडा आणि खप पुष्कळ असेही होते. प्रत्येक व्यापा-याने हे तत्त्व ओळखून तदनुरूप आपल्या चित्ताची तयारी ठेवली पाहिजे. एखाद्या आरशाकडे आपण पाहिले तर त्यांत आपले तोंड आपणांस दिसते. आपण तोंड वांकडे केलें कीं आरशांतलें तोंडही वांकडे होते, आपण हंसलों तर आरशांतलें तोंडही हंसते. हाच क्रयविक्रयाचा प्रकार आहे. हेच देवाण-घेवाण.
 अशा रीतीने व्यापार करीत असतां आपले पाय त्यांत सांपडतात, हे कसे होते ? आपण जें कांहीं देत त्यामुळे आपण गुंतत असे नाहीं; तर त्याचा मोबदला आपणांस मिळावा असे जे आपणांस वाटत असते, त्यामुळे आपण त्यांत गुंतून पडतों. पुष्कळ वेळां आपल्या प्रेमाच्या मोबदल्यांत आपणांस दुःखाची प्राप्ति होते. असें कां ? आपण प्रेम दिले यामुळे हे दुःख प्राप्त झालें असें नाहीं; तर उलट प्रेमाची जी अपेक्षा आपल्या हृदयांत होती, ती आपल्या दुःखाला कारण झाली, असे आपणांस आढळून येईल. ज्या ठिकाणी कशाची तरी अपेक्षा-गरज-उत्पन्न होते तेथे दुःख येतेच. गरज-आशा-हीच आपल्या अनेक दुःखांचे कारण आहे. आशापूर्ति यशापयशावर अवलंबून असल्यामुळे तिजपासून दुःखाची प्राप्ति केव्हांना केव्हा होणारच.
 याकरितां आपल्या जीवनक्रमांत खरी यशःप्राप्ति हवी असे वाटत असेल आणि खरे सुख मिळविण्याची इच्छा असेल, तर हे तत्त्व लक्ष्यात ठेवले पाहिजे. ज्याला प्रतिफलाची अपेक्षा नसते त्यालाच ख-या यशाची प्राप्ति होते. या आरशांतलें तोंडही हंसते.