पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘उधाण वारा' : स्त्रीच्या वयःसंधीची गाथा


 तसलिमा नसरीनचे सारे बोलणे नेहमीच नवा उधाण वारा घेऊन येते. त्यामुळे साक्षात ‘उधाण वारा' म्हणून लिहिलेले लेखन बहुचर्चित झाले नाही तरच आश्चर्य! यापूर्वी तसलिमा नसरीन यांनी १९९९ साली ‘आमार मेयेबेला नावानं आपल्या आत्मचरित्राचा पहिला भाग वाचकांना नजर केला आहे. ते आत्मचरित्र म्हणजे तिच्या कौमार्याची कथा होती. जन्मापासून ते ऋतुप्राप्तीपर्यंतच्या (१९६२ ते १९७६) आठवणी, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी त्यांनी चितारले. तेव्हा विसाव्या शतकाचा सूर्य अस्तंगत होत होता. आता त्यानंतर एक दशक मागे पडले नि परत त्या आणखी एका दशकाची आपली व्यथा, कथा ‘उधाण वारा' मधून मांडत आहेत. हा 'आमार मेयेबेला चा दुसरा भाग आहे. त्यामुळे उधाण वारा' समजून घ्यायचा, तर ‘आमार मेयेबेला' वाचणे ही त्यांची आपोआप पूर्वअट होऊन जाते.

 ‘आमार मेयेबेला' मध्ये तसलिमा नसरीन यांनी पूर्वज, परिवार, जन्म, बालपण, शिक्षण, संस्कार, आई-वडील असं कौटुंबिक जग तर चित्रित केलंच आहे. पण त्यात त्यांनी एक मुलगी म्हणून होणारा आपला कोंडमारा, लैंगिक छळ, धाकदपटशा सांगत आपल्या जीवनात एक मुलगी म्हणून न्यूनगंड,भयगंड कसा निर्माण झाला त्याचे सविस्तर व प्रत्येकारी वर्णन केले आहे. बांगलादेशाच्या मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या भागात आपलं कौमार्य हेही दुसरे मुक्तियुद्धच कसे होते, ते प्रभावीपणे मांडल्यामुळे जगभरच्या वाचकांनी त्या पहिल्या भागास पहिली पसंती दिली होती. तसलिमा नसरीन यांच्या लेखनशैलीचे हे वैशिष्ट्य असते की, त्या जे लिहितात त्यात स्त्रीवादी अस्तित्व संघर्षाची अनिवार्यता येत असते.

 ‘उधाण वारा' या शीर्षकापासूनच ते आपली पकड घेते. कौमार्य ओलांडून ही मुलगी किशोरी होते...पुढे युवती... हा कालखंड म्हणजे मैत्रीचा न संपणारा वसंत ऋतूच असतो. या मैना असतात तसे मोरही! चंदना, चकमा, सजनी या आपल्या मैत्रिणींच्या सहवासात तसलिमा किशोरी होते... यातली चंदना म्हणजे तसलिमाची ‘फेवरिट’... हे ‘फेवरिट’ प्रकरण मैत्रिणींत काय असते, ते

वेचलेली फुले/१५२