या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तांस सर्वथैव मान्य आहे; आणि अग्रहायण याचा, ज्याच्यापुढे वर्ष लागते लणजे ज्या नक्षत्री सूर्य आला असतां संपातांत असतो आणि वर्ष सुरु होतें तें नक्षत्र, असा अर्थही त्यांस मान्य आहे. आतां ते ह्मणतात, "[पूर्णिमान्त] मासाच्या अन्तीं मृगशीर्ष नक्षत्री चंद्र असतां दुसरे दिवशीं वर्ष सुरु करण्याची पद्धति होती, आणि त्याकरितां त्या नक्षत्रास आग्रहायणी नांव पडले असले पाहिजे." आतां पौर्णिमेला जर चंद्र मृगांत आहे व त्या वेळी वसंतसंपात मृगांत असून वर्षारंभ जर वसंतसंपातीं सूर्य असतानां होतो आहे, तर सूर्यही तेव्हां मृगांतच आला. पण तो दिवस पौर्णिमेचा आहे हे विसरता कामा नये. सूर्यचंद्र त्या दिवशी समोरासमोर असावयाचे. ह्मणजे अशी स्थिति होणे शक्य नाही असे होते. म्हणून त्या वेळचे वर्षारंभ धरण्याचे तत्व तरी काही निराळे असले पाहिजे, अथवा मार्गशीर्ष महिना वर्षारंभाचा महिना नसला पाहिजे, किंवा अग्रहायणाचा वरचा अर्थ नसून दुसरा काही तरी असला पाहिजे. पण या पैकी पहिली व शेवटची गोष्ट हणजे वसंतांत वर्षारंभ व अग्रहायणाचा वर दिलेला अर्थ या दीक्षितांस मान्य आहेत. अर्थात् मार्गशीर्ष हा वर्षारंभाचा महिना नव्हता हे सिद्ध होते. आतां उदगयनीं वर्षारंभ होत नव्हता असें जें दीक्षितांचे ह्मणणे आहे, त्याचा थोडा विचार करूं. “न पूर्ववोःफल्गुन्योरभिमादधीत । एषा वै जघन्या रात्रिः संवत्सरस्य । यत्पूर्वे फल्गुनी ॥ \" पाए