या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. खरोखरच तेव्हां ते पूर्वीपासून परंपरागत आलेले होते, असें अगदी कबूल केले पाहिजे. याप्रमाणे तैत्तिरीय संहितेत सांगितलेल्या दोन प्राचीन वर्षारंभांपैकी एकाची परंपरा ऋग्वेदापर्यंत नेऊन पोचविली. व तत्संबंधाच्या वैदिक कथांस, पारशी व ग्रीक या दुसऱ्या आर्य शाखांच्या जुन्या ग्रंथांवरून व त्यांत असलेल्या दंतकथांवरून पूर्ण पाठबळ मिळते असेंही आपण पाहिले. एकेका राष्ट्रांतील कथा व्यक्तिशः घेतल्यास त्या कदाचित् निर्णायक नसतील. परंतु त्यांची परस्पर तुलना करतां जर त्या सर्वांवरून एकच अनुमान निघतें असें आढळले तर मात्र त्या सर्वांचे एकत्र फल निर्णायकच असले पाहिजे. या तीन राष्ट्रांच्या पुराणकथांमधील साम्य विद्वान् लोकांस अगोदरच कळून आलेले आहे. परंतु हे सर्व लोक ज्या काळी एकत्र रहात असत, त्या काळाचा कांहीं सुगावा न लागल्यामुळे त्या सर्व कथांचे त्यांस एकीकरण करता आले नाही. पण ओरायनसंबंधाच्या गोष्टी व विशेषेकरून त्याची वसंतसंपातांतील स्थिति बांवरून हा सुगावा आपणाला मिळतो, व त्यावरून अति प्राचीन आर्यसुधारणाकालाचे कोडे बऱ्याच समाधानकारक रीतीने सुटते. ओरायन हा कोण व कोठला हे आतां समजले. आतां, इन्द्रा. वृत्राला किंवा नमुचीला मारण्याचे फेनात्मक शस्त्र झणजे काय, चिन्वत् सेतूवर ठेवलेला चार डोळ्यांचा कुत्रा हा कोण, अथवा ऋभूनां श्वानाने संवत्सराच्या शेवटी जागे केलें ह्मणजे काय, या गोष्टींबद्दल काही तरी तर्क करीत बसण्याचे कारण नाही.