या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. इतके समजल्यावर मग या विषयांत ज्योतिःशास्त्रविषयक काठिण्य मुळीच नाही. नक्षत्रादिकांच्या स्थानपर्यायावरून आपण काल मोजीत असतो. पण या कालमापनकोष्टकांत संपाताच्या प्रदक्षिणाकालाहून मोठे परिमाण असलेलं अद्यापि माहीत नाही. ह्मणून जर आपल्याला प्राचीनकाळच्या नक्षत्रादिकांच्या जागा निश्चित समजल्या तर त्या कालाचे मान निश्चित करण्यास हे उत्तम साधन होईल. सुदैवाने असल्या प्रकारचे उल्लेख ऋग्वेदांत आहेत व ते ग्रीक, पारशी व भारतीय आर्य एकत्र रहात असत त्या वेळचे आहेत; हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. म्हणून त्यांचे ग्रीक व पारशी कथांच्या साहाय्याने आपणांस स्पष्टीकरण करता येईल. फाल्गुनी पूर्णमास हा एकदां वर्षारंभ होता असे सांगणाऱ्या तैत्तिरीय संहितेंतील व ब्राह्मणांतील वचनांवरून पहातां पहातां आपल्याला मृगशीर्षाचे असे एक नांव आढळले की, त्याचा वास्तविक अर्थ घेतल्यास त्यावरून प्राचीन काळी एकदां वसंतसंपात त्या नक्षत्रांत होता असे दिसेल. यावरून तैत्तिरीयसंहितावचनाच्या सत्यत्वाबद्दल साक्ष पटली. कारण फाल्गुनी पौर्णिमेला जर सूर्य दक्षिणायनी असला तर पूर्णचंद्र सूर्याच्या अगदी समोर ह्मणजे उत्तराफल्गुनी नक्षत्रांत असला पाहिजे. ह्मणजे उत्तराफल्गुनी नक्षत्री उत्तरायण बिंद आला; व वसंतसंपात मृगशीर्षांत आला.* याच मानाने

  • आकृति पहा.