या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. पहातां दक्षिणायन जर माघी पौर्णिमेला झाले तर वसंतसंपात कृत्तिकांत येतो, व तें पौषांत झाल्यास तो संपात अश्विनीत येतो. ह्मणजे अश्विनी व पौष, कृत्तिका व माघ, आणि मृगशीर्ष व फाल्गुन या अयनचलनाच्या योगाने अनुक्रमें बदलत जाणाऱ्या वर्षारंभांच्या परस्परसंबद्ध जोड्या आहेत. हे सर्व वर्षारंभ आर्यसुधारणेच्या निरनिराळ्या काळी अस्तित्वात होते हे दाखविणारी वचनें व पुराणकथा पुष्कळ आहेत हे आपण पूर्व विवेचनांत पाहिले आहेच. याप्रमाणे येथवर आपण तैत्तिरीयसंहितेत सांगितलेल्या दोन प्राचीन वर्षारंभांपैकी एकाचा विचार केला. परंतु त्याच्याच बरोबर व बहुतेक त्याच शब्दांनी सांगितलेल्या दुसऱ्या वचनाचा अर्थ कसा करावयाचा ? याचे उत्तर जसा एकाचा केला तसाच दुसयाचा करावयाचा हेच होय. फाल्गुनी पौर्णिमेला दक्षिणायन झाल्यास वसंतसंपात मृगशीर्षात येतो. त्याचप्रमाणे चैत्रीपौर्णिमेला जर ते झाले तर वसंतसंपात पुनर्वसूत होईल. (आकृति पहा ) हा काळ फारच प्राचीन होतो. वेदांमध्ये संदिग्ध गोष्टींपलीकडे त्यासंबंधानें कांहींच आढळत नाहीं; आणि ग्रीक व पारशी लोकांत असल्या संदिग्ध गोष्टीही नाहीत. पुनर्वसूत वसंतसंपात होता अथवा ते नक्षत्र नक्षत्रचक्रांत कधीं पहिले मानीत असत, असे स्पष्ट सांगणारी वचनें आढळत नाहीत. अथवा तद्वाचक दुसरे एकादें नावही नाही की ज्यावरून आग्र