या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८७ वेदकालनिर्णय. हायणामध्ये सापडलेल्या गोष्टींसारख्या गोष्टींचा काही पत्ता लागेल. तरी पण यज्ञग्रंथांत पुनर्वसूंच्या प्राचीन स्थितीच्या कांहीं खुणा आहेत. अदिति ही पुनर्वसूची अधिष्ठात्री देवता आहे; आणि ऐतरेयां ब्राह्मण व तैत्तिरीयसंहिता यांमध्ये असे सांगितले आहे की " अदितिपासून सर्व यज्ञांना आरंभ व्हावा, व अदितिबरोबरच त्यांची समाप्ति व्हावी, असा तिला वर मिळालेला आहे." यज्ञ देवांपासून निघून गेला, तेव्हां त्यानां कांहीं विधि करितां येईनासे झाले. व तो कोठे गेला असावा हेही त्यांना समजेना. अशा स्थितीत अदितीने देवांना मदत करून यज्ञारंभ करून दिला; व ह्मणून वर सांगितलेला वर तिला मिळाला आहे. याचा अर्थ असा की या काळाच्या पूर्वी यज्ञ वाटेल तेव्हां करीत असत; परंतु तेव्हांपासून ते अदितीपासून करावे असें ठरवून टाकिलें. ह्मणजे अदिति ही यज्ञाची ऊर्फ संवत्सराची आरंभक झाली. वाजसनेयी संहितेंत ( ४. १९ ) अदितीला 'उभयतः शीष्णी' ह्मणजे " दोहोंकडून डोके असलेली " असे म्हटले आहे; आणि ही डोकी मणजे अदितीपासून आरंभ होणाऱ्या व अदितीपाशी संपणाऱ्या यज्ञांची टोके होत, असा अर्थ टीकाकारांनी दिला आहे. + यज्ञो वै देवेभ्य उदक्रामत्ते देवा न किंचनाशक्नुवन्कर्तुं न प्राजानंस्ते ऽब्रुवन्नदितिं त्वयेमं यज्ञं प्रजानामेति सा तथेत्यब्रवीत्सा वै वो वरं वृणा इति । वणीष्वेति सैतमेव वरमवृणीत मत्प्रायणायज्ञाः संतु मदुदयना इति तथेति । (ऐ. ना. १-७).