या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. । याज्ञिक परिभाषेमध्ये विषूवानाच्या पूर्वीच्या चवथ्या दिवसाला अभिजिदिन असें मटले आहे. त्यावरून वरील गोष्टीस आधार मिळतो. अभिजित् दिनाचे नांव अभिजित् नक्षत्रावरून पडले असें मानल्यास, ह्मणजे त्या दिवशी सूर्य त्या नक्षत्री होता असें समजल्यास, विषूवान् ऊर्फ शरत्संपात अभिजित् नक्षत्राच्या पुढे चार अंश येतो. अदिति ऊर्फ पुनर्वसू यांमध्ये वसंतसंपात होता असें मानिल्यास गणिताने अभिजित् नक्षत्राची हीच स्थिति येते. सूर्यसिद्धान्ताप्रमाणे रेवतीपासून पुनर्वसूचे विषुवांश ९३ व अभिजित्चे २६६ व चाळीस कला अथवा सुमार २६७, असे आहेत. पुनर्वसूंत वसंतसंपात होता असें मानिले झणजे शरत्संपाताचे ९३+१८०=२७३ विषुवांश झाले. ह्मणजे आभिजित् शरत्संपाताच्या ऊर्फ विषुवदिनाच्या मागे २७३-२६७-६ अंश आले. आतां पुनर्वसूंत वसंतसंपात असला ह्मणजे या विषुवदिनाची खूण धरण्यासाठी शरत्संपाताला अभिजित् इतकें दुसरे कोणतेही नक्षत्र जवळ नाही. अशा रीतीने हे नक्षत्र विषुवागमनसूचक असल्यामुळे त्याचे मांव पूर्वी नक्षत्रांच्या यादीत पडले असावें; व जेव्हां अयनचलनामुळे हा त्याचा उपयोग नाहीसा झाला तेव्हां ते त्यांतून निघाले असावे असे दिसते. तात्पर्य अभिजिदिनाच्या स्थानावरून अदितीच्या वरील गोष्टींस बराच आधार मिळतो. द्वादशादित्य हे अदितीचे पुत्र आहेत, याचा अर्थ आदित्याच्या वार्षिक क्रमाला आरंभ अदितीपासून होता असाच केला पाहिजे. तसेच ती वसंतसंपाती असल्यामुळे देवयान