या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८९. वेदकालनिर्णय. व पितृयान यांच्या मध्ये होती ह्मणून तिला देवांची आई असें ऋग्वेदांत* मटले आहे तेंही योग्यच आहे. तिच्यापासून आदित्य उत्पन्न झाले ( ऋ० १०-७२-८), याचा अर्थही सूर्याचा वार्षिक क्रम अदितीपासून सुरु होत असे असाच होय. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये नक्षत्रीय प्रजापतचि स्वरूप वर्णन केलें -- आहे. त्यांत चित्रा हे त्याचे शीर असें मटले आहे. याविषयी शि/ अनेकांचे अनेक तर्क आहेत, पण त्यांपैकी कोणताच समाधानकारक नाही. बादरायणानेही ब्रह्मचाचे असेंच स्वरूप कल्पिलें आहे, व त्यांत तो मेष हे त्याचे शिर असें ह्मणतो. आतां मेष ही पहिली राशी असल्यामुळे तिला शिर झणणे योग्यच आहे. व याच अनुरोधानें तैत्तिरीय संहितेंतील प्रजापतिस्वरूपाचा अर्थ केल्यास, चित्रापूर्णमासी ज्या वेळी वर्षारंभ होत असे त्या वेळी चित्रा हे शिर होणे साहजिक आहे. तरी या गोष्टीविषयी काही खात्री देतां येत नाही.

  • ऋग्वेद १०-७२-५.

१ यो वै नक्षत्रीय प्रजापतिं वेद । उभयोरेनं लोकयोर्विदुः । हस्त एवास्य हस्तः । चित्रा शिरः । निष्टया हृदयम् । उरू विशाखे । प्रतिष्ठानूराघाः । एष वै नक्षत्रीयः प्रजापतिः। २ मेष: शिरोथ वदनं वृषभो विधातुः वक्षो भवेन्नमिथुनं हृदयं कुलीरः । सिंहस्तथोदरमथो युवतिः कटिश्च बस्तिस्तुलाभृदथ भेद्दनमष्टमः स्यात् ॥ धन्वीचास्योरुयुगं मकरो जानुद्वयं भवति । जंघाद्वितयं कुंभः पादौ मत्स्यद्वयं चेति ॥