या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. - या दोन गोष्टी खेरीज करून वेदकालीन आद्य पंचांगासंबंधानें आणखी काही माहिती लागेलशी दिसत नाही. तरी या गोष्टींवरून व चित्रापूर्णमासी वर्षारंभ होत असे या तैत्तिरीय संहितेतील स्पष्ट वचनावरून पूर्वी, पूनर्वसूंमध्ये वसंतसंपात असतांनां वर्षारंभ करणारे पंचांग होते हैं निःसंशय ठरते. येथवर आपण एकंदर तीन प्रकारच्या प्राचीन पंचांगांचा विचार केला. त्यांपैकी अगदी पहिल्याच्या काळाला आपण अदितिकाळ किंवा मृगशीर्षपूर्वकाल ह्मणूं. याची मर्यादा अदमासे इ. स. पूर्वी ६००० पासून ४००० पर्यंत. या काळी पूर्ण ऋचा वगैरे झाल्या असाव्या असे दिसत नाही. अर्धवट गद्य, व अर्धवट पद्य, अशा वाक्यांत देवांची नांवें, त्यांच्या विशेष संज्ञा व पराक्रम वगैरे प्रथित केले असावे. या काळाविषयींचें कांहींच स्मारक श्रीक व पारशी लोकांत राहिले नाहीं; व याचे कारण एवढेच असावें की, हे लोक जेव्हां आपलें मूलस्थान सोडून निघाले तेव्हां त्यांनी त्या वेळी चालू असलेले पंचांग मात्र बरोबर नेले. परंतु भारतीय आर्यांनी आपल्या परंपरागत गोष्टी मोठ्या काळजीने श्रद्धापूर्वक जतन करून ठविल्या आहेत. आतां दुसरा जो मृगशीर्ष काल, त्याच्या मर्यादा स्थूलमानाने इ. स. पूर्वी ४००० पासून २५०० पर्यंत. हा काळ ह्मणजे आर्द्रा नक्षत्रापासून कृत्तिकांशी वसंतसंपात येईपर्यंतचा काळ होय. हा काळ सर्वांत महत्वाचा आहे. ऋग्वेदाची बरीच सूक्तं या वेळी झाली होती,